पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुत्रशोक.

[६७ ]

त्याच्या पाठीवर सपासप छड्या मारिल्या. तसेच त्याच्या हातून व्रात्यपणाची कृत्ये घडल्याबद्दल तुकोजीरावाने त्यास दोष दिला असतां त्याने त्यास आपल्या हुजऱ्याकडून गचांडी मारवून वाड्याबाहेर घालवून दिले व पुनः कधी वाड्यांत न येण्याविषयी सक्त ताकीद केली. अशा त्याच्या वेडेपणाच्या अनेक गोष्टी नित्य घडून येत. एकदा तो लहरींत आला ह्मणजे कोणास कामगिरीवांचून बक्षीस आणि अपराधावांचून शिक्षा देत असे. सारांश, भागवतांत प्राचीन काळी झालेल्या वेन राजाचे जसे वर्णन केले आहे तद्वतच मालीरावाची सर्व कृत्ये होत असत. या त्याच्या दुष्टपणाच्या सर्व कृत्यांचा परिणाम तो होळकराची गादी चालविण्यास अगदी नालायक आहे असे ठरून सर्व लोकांस अत्यंत त्रास झाला. तथापि साध्वी अहल्याबाईकडे पाहून व तिची आपल्या लोकांविषयी असलेली कळकळ लक्षात आणून बरेच दिवसपर्यंत लोकांनी त्याचा ताप निमूटपणे सहन केला.

 पण नासलेले फळ जसें फार वेळ झाडास चिकटून रहात नाही, त्याप्रमाणेच या बिघडलेल्या पोराची त्रासदायक कारकीर्द फार दिवस होळकरांच्या प्रजेस भोगावी लागली नाही. मल्हाररावांच्या मागे एक वर्षांच्या आंतच काही आकस्मिक कारण घडून मालीरावाचा अंत झाला. आणि त्यामुळे त्याच्या दुर्वतनाने पुढे होळकरांच्या राज्यांत होणारा अनर्थ टळला.

 मालीरावाचा जो आकस्मिक अंत झाला त्यासंबंधाने अशी वार्ता प्रसिद्ध झाली की, सच्छील ब्राह्मणांचा छल करणाऱ्या आ-