पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुत्रशोक.

[६५ ]


मरणाने झालेले होळकरशाहीचे नुकसान आपला हा पुत्र आपल्या शौर्याने व प्रजापालनाने भरून काढून मला सुख देईल अशी साध्वी अहल्याबाईनें आशा केली होती! पण ही आपली आशा सर्वथैव खोटी आहे असे तिच्या पुत्राने अथवा दुर्दैवानेच का ह्मणाना-लवकरच तिच्या प्रत्ययास आणून तिला शोकार्णवांत बुडवून टाकिलें ! त्या साध्वीचा दानधर्माकडे ओढा विशेष, ह्मणून सुभेदारांनी तिला बरीच मोठी त्या कृत्याकडे खर्च करण्याकरितां नेमणूक करून दिली होती. पण परोपकाराकडेच जिने आपलें तनमन लाविलें तिला अशी मोजकी नेमणूक कशी पुरी पडणार? तथापि सासूसासरे जिवंत होते तोपर्यंत तिने त्यांतच आपलें समाधान मानून त्यांच्या मनास अधिक त्रास दिला नाही. पण आतां त्या उभयतांचा काळ झाला व सर्व लक्ष्मी तिच्या हातांत आली. मग ज्या दानधर्माकडे तिचा स्वाभाविक ओढा, तो आपल्यापायीं तिची सर्व दौलत खर्ची घातल्यावांचून तिला स्वस्थ कसे बसू देणार? साध्वी अहल्याबाईने पूर्वीपेक्षा अधिक दानधर्म करण्याचा आतां नित्यक्रम सुरू केला. तिच्या या सत्कृत्यामुळे तिच्या जिवास समाधान वाटले पाहिजे होते; पण गादीवर जे तिचे चिरंजीव विराजमान झाले होते त्यांच्या कृतीने तिला उलटा ताप झाला. मालीरावास गादी मिळाल्यापासून तो वेडेवेडे चार करूं लागला व मनास वाटेल त्याप्रमाणे भलभलतें आचरण करूं लागला. तथापि या त्याच्या बहुतेक आचरणांत पापकर्मापेक्षा वेडससरपणाचाच पुष्कळ भाग होता.

 त्याची आई म्हणजे केवळ परोपकाराकरितां अवतीर्ण