पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६२]


भाग सहावा.

 मल्हाररावांच्या नंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या स्त्रीचेही देहावसान झाले. उभय प्रसंगी आमच्या चरित्रनायिकेस जें दु:ख झाले ते सांगता येत नाही. वडील ह्मणून तिजवर ममता करणारी तेवढीच राहिली होती. ती दोघे सोडून गेल्यामुळे तिला मी अगदी उघडी पडले असे वाटू लागले. तथापि ही मृत्युलोकची वस्ति आहे.बोलावणे आले ह्मणजे कोणालाही गेले पाहिजे त्यावांचून गत्यंतर नाही असा विचार करून तिनं त्यांचं वियोगदुःख सहन केले व पुत्राच्या कारकीदींची उत्तम व्यवस्था करून देण्याकरिता काही दिवस ती महेश्वर सोडून पुन:इंदुरास येऊन राहिली.


भाग सहावा समाप्त.