पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६०]
भाग सहावा.


दर्शन घेऊन रात्रीचा फराळ करीत असे व नंतर परमेश्वराची स्तोत्रं वगैरे ह्मणून निद्रा घेई. पति मरण पावल्यापासून आपल्या धर्मात सांगितलेले सर्व उपासतापासादि वैधव्यधर्म ती मोठ्या कडकडीत रीतीने पाळीत असे, व कसाही प्रसंग आला अथवा शरीरास असमाधान वाटले तरी त्यांत अंतर पडूं देत नसे. वाचक हो ! या आमच्या चरित्रनायिकेशिवाय कोणत्या दुसया राजस्त्रियेकडून अशी देहदंडाची साधनें घडली असतील बरें?

 अहल्याबाईने संसाराचा सर्व उपद्व्याप सोडून रेवातरी बास केला व आपले आयुष्य दानधर्मादि पुण्यकर्मात घालविण्याचा निश्चय केला आणि बरेच दिवस तदनुसार आचरण ठेवून आपल्या राज्यांत मोठी कीर्ति संपादन केली. तरी ईश्वरसिंकेत कांहीं याहून निराळाच होता की त्यायोगाने ती पुनः राज्यकारभारांत पडून तिची दिगंत कीर्ति झाली तो प्रकार असा. सुभेदारांस उत्तरहिंदुस्थानांत पुनः मोहिमीवर जाण्याविषयीं श्रीमंतांकडून पत्र आले. या वेळी त्यांचे मातारपण झाल्यामुळे ह्मणा, अथवा कमीत कमी चाळीस वर्षे युद्धाच्या श्रमांत घालविल्यामुळे ह्मणा, त्यांच्या प्रकृतीस क्षीणता आली होती व त्यामुळे शरिरी असमाधान वाटत असून युद्धाविषयी त्यांस मुळीच उत्साह राहिला नव्हता; तथापि धन्याची आज्ञा पाळण्याविषयी ज्यांचा कृतसंकल्प ते अशा प्रसंगी आपल्या शरीराची थोडीच पर्वा करणार ? त्यांचा पुतण्या तुकोजी हा नेहमी त्यांच्या बरोबर असे; शिवाय या वेळी त्यांनी आपल्या नातवास ह्मणजें मालीरावासही बरोबर घेतले, व पूर्वीप्रमाणेच राज्याची सर्व व्यवस्था अहल्याबाईच्या अंगावर टाकून व दिवाण गंगाधरपंत यांस तिच्या आज्ञेनें