पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मल्हाररावांचा मृत्यु.

[५९]


न येतां त्यांनीही ती मान्य केली. तथापि सुभेदारांनी जो तिजवर एकदा राज्यभार टाकला तो पुनः आपणाकडे घ्यावयाचा नाही असा निश्चय केला. तिची मुलगी जेथे दिली होती ते महेश्वर शहर नर्मदेच्या काठी असल्यामुळे क्षेत्रच होते व त्यांच्या राजधानीपासूनही ते फार लांब नव्हते, ह्मणून तेंच तिला राहण्याकरितां त्यांनी पसंत केलें, व केवळ देवाच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वडील माणसांची आज्ञा पाळण्याविषयी तत्पर असणाऱ्या अहल्याबाईने तेथेच राहण्याविषयी आपला निश्चय केला. नंतर पूर्वीपेक्षाही बरीच मोठी रक्कम तिला दानधर्म करण्याकरितां नेमून देऊन तिची महेश्वरास रवानगी केली.

 सुभेदारांनी आपल्या स्नुषेसाठी महेश्वराची जी निवड केली ती खरोखरच चांगली होती. हे शहर मोठे असून नर्मदेसारख्या महानदीच्या योगाने त्यास नैसर्गिक पवित्रता व रमणीयता आलेली आहे. पुराणांतरी ठिकठिकाणी ज्या माहिष्मती नगरीचें नांव ऐकू येते तीच नगरी हें सांप्रतचें महेश्वर शहर होय. असो. तेथे जाऊन राहिल्यापासून आमच्या चरित्रनायिकेचा नित्यक्रम कसा होता हें प्रथम सांगितले पाहिजे. पाहाटेच्या प्रहररात्री ती निजून उठत असे. नंतर प्राताधि व स्नान आटपून देवपूजा करी; त्या कर्मातच तिचा सकाळचा सर्व वेळ मोडे: नंतर ब्राह्मणांस गोप्रदाने देई. इतक्यांत दोनप्रहर होता त्यानंतर ती भोजन करीत असे. भोजन झाल्यावर किंचित् वामकुक्षि करून तिला भेटावयास कोणी आल्यास त्यांच्याशी गोष्टी करी. नंतर त्या ठिकाणी अंबादास ह्मणून एक मोठा कर्मठ व विद्वान, बाह्मण होता त्यापासून पुराण ऐके, तो सायंकाळ होई: नंतर देव-