पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ५८]
भाग सहावा.


कोठे काही माहिती मिळत नाही. मुक्ताबाई इंदुरापासून पंधरा कोसांवर नर्मदातीरी महेश्वर ह्मणून शहर आहे, तेथील यशवंतराव पानसे या नांवाच्या एका जहागीरदाराच्या मुलाला दिली होती.

 एकाद्या साधारण स्त्रीला आपल्या मुलाचे लग्न होऊन त्याच्या दोन हातांचे चार हात झाले व घरांत सून आली ह्मणजे एक प्रकारचा मोठेपणा वाटतो, व तत्संबंधी संसारिक सुखाविषयी तिच्या मनाची प्रवृत्ति दृढ होते; पण आमच्या चरित्रनायिकेस जेव्हां तिचा पतीशी वियोग झाला, तेव्हांच जगांतले आपले सर्व सुख व मोठेपणा आपणास अंतरला, असे पुरे वाटून राहिले होते, व ते आमरण कायम होते. कन्यापुत्रांची लग्ने झाल्यामुळे तिची संसाराकडे कोठून प्रवृत्ति होणार ? पति मेल्यापासून तिने आपल्या सर्व अलंकारांचा व उंच प्रतीच्या वस्त्राभरणांचा त्याग केला. त्या दिवसापासून तिनें रंगाचें ह्मणून वस्त्र कधी परिधान केले नाही. व अंगावर एकही अलंकार घातला नाही, इतकेच नव्हे, तर जेवणांत देखील गोड पदार्थ व मद्यमांस यांचे कधीं सेवन केले नाही. पति मेला तेव्हां मुले लहान होती, ती मोठी होत तोपर्यंत त्यांचे लालनपालन मोठ्या दक्षतेने केले, व त्यांची लग्न करून दिली. आतां आपल्या देहाचे काहीतरी सार्थक्य केल्याखेरीज जगांत राहून काही अर्थ नाही, असा त्या साध्वीने विचार करून आपले अवशिष्ट आयुष्य सद्धर्माचरणांत घालविण्याकरितां एकाद्या पुण्यक्षेत्रांत मला जाऊन राहू द्या. अशी सासुसासऱ्यांस विनंति केली; व तिच्या ह्या सद्विचाराच्या आड