पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५६]
भाग सहावा.


रावांच्या कानावर गेली नाही. या प्रमाणे राज्यकारभार उत्तम प्रकारें बजावूनही दरसाल खजिन्यांतील शिलकेंत लाख दोन लाख रुपये आपले वाढावयाचेच. आपल्या सुनेची राज्यव्यवस्था बघण्याची ही उत्तम रीतीची टापटीप पाहून सुभेदारांस अत्यानंद होई, व ते वारंवार असें ह्मणत की, दौलत मिळविण्यास जरी माझा प्रारब्ध योग आणि पराक्रम हे कारणीभूत असले तरी तिची व्यवस्था कशी करवी ते मला काही कळत नाही, ते माझ्या अहल्याबाईसच ठाऊक! इंतक्या अल्पवयांत अहल्येच्या अंगी राज्यकारभार सुव्यवस्थितपणे चालविण्याचे ज्ञान एकाद्या चतुर मुत्सद्याप्रमाणे आहे या गोष्टीबद्दल व तिच्या अंगी असलेल्या इतर सद्गुणांबद्दल ते आपल्या जवळच्या सर्व लोकांजवळ तिची तारीफ करीत व त्या योगाने मनास फार आनंद मानून घेत. एकंदरीत ती त्यांना इतकी प्रिय झाली होती की तिच्या मनास कोणत्याही रीतीने वाईट न वाटूं देण्याची ते फार खबरदारी घेत. राज्यसंबंधाने अशी वाहवा एकाद्या मोठ्या चतुर मुत्सद्यालाही मिळणे कठिण आहे. असो.

 पानिपतच्या भयंकर संग्रामात आपल्या लोकांचा झालेला पराभव व त्यामुळे शत्रूंनी केलेली त्यांची विडंबना या गोष्टी ऐकून ह्या साध्वीस अतिशय दुःख होऊन रडे कोसळले. त्या घोर रणसंग्रमांतून दैवाने वांचून वस्त्रहीन झालेले व अंगावर शस्त्रांच्या जखमा पडलेले जे लोक दक्षिणेत येतांना इंदुरास आले त्यांविषयी तिने फारच कळकळ दाखविली. आपल्या पदरच्या लोकांकडून त्यांना अन्नवस्त्राचा भरपूर पुरवठा करून व त्यांच्या औषधोपचाराची सर्व तजवीज करून त्यांना बरे केले, आणि