पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मल्हाररावांचा मृत्यु.

[५३]


आणि असे सांगतात की, त्या दिवशी तिने त्या महालास एकवार जें कुलूप लाविलें तें आमरण पुनः काढिलें नाहीं ! सुभेदारांच्या पदरच्या सरदारांच्या स्त्रिया, ज्या तिच्या मैत्रिणी झालेल्या होत्या, त्यांना हा तिजवर गुदरलेला प्रसंग पूर्वीच कळून चुकला होता, ह्मणून तिचे शांतवन करण्याकरितां ती वाड्यांत आल्याचें वर्तमान कळतांच त्या तिला भेटण्यासांठी आल्या, तेव्हां तर तिला जे काही झाले ते सांगता येत नाहीं ! 'पतीसह आपण ऐश्वर्याने नांदत असतां अंगावर अनेक हिऱ्यामोत्यांचे अलंकार घालून मोठ्या डौलाने मी ज्यांना अनेक विचाराच्या गोष्टी सांगितल्या, व आपल्या हाताने ज्यांच्या कपाळी अनेक वेळा हळदकुंकू लावून त्यांची प्रसंगोचित थट्टा केली, त्यांना आतां मी या फुटक्या कपाळानें कशी भेटू ऐन तारुण्यांत जिचा गुणवान् पतीने त्याग केला अशी ही अहल्या खचित पूर्वजन्मींची महापातकी आहे, तर इची संगतिही आपल्या उपयोगी नाही. असें नानाविध कुतर्क त्यांच्या मनांत येऊन पूर्वी जो माझा त्यांणी आदर केला त्याबद्दल आतां त्या तिरस्कार तर करणार नाहीत' ? असे विचार तिच्या मनांत येऊन ती दूर वाड्यांतल्या एका अंधाऱ्या खोलीत जाऊन बसली, ती बरेच दिवसपर्यंत बाहेर आली नाहीं ! पतिनिधनाने कुलीन स्त्रियेची अशी स्थिति होणे साहजिक आहे, याबद्दल तिला दोष देतां येत नाहींच. उलट ह्या आचरणाने तिचे जितकें अभिनंदन करावे तितकें थोडेंच वाटते. असो.

 वर्षसहामहिने लोटल्यानंतर सुभेदारांस पुनः आपल्या धन्याच्या कामगिरीवर जाण्याचा प्रसंग आला; त्या वेळेस त्यांनी