पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतिवियोग.

[५१]


 मल्हाररावांनी सुरजमल्लाचा शिरच्छेद करण्याची रागाच्या आवेशांत शपथ घेतली ह्मणून वर सांगितले आहे. ती त्यांच्याकडून सिद्धीस जाणे मुळीच अशक्य नव्हते, व हे त्यांच्या शत्रुसही कळून चुकले होते. पण सुरजमल्लाने आपली कपटविद्या लढवून युक्तिप्रयुक्तीने श्रीमंतांच्या बलिष्ठ सरदारांत वितुष्ट पाडण्याचा प्रसंग आणिला, त्यामुळे त्यांना त्या शपथेपासून माघार घेणे भाग पडले. याविषयींची सर्व हकीकत सुभेदारांच्या चरित्रांत आहे, पण ती येथे देणे अप्रासंगिक होईल, ह्मणून ती त्यांतूनच वाचण्याविषयी वाचकांस शिफारस करितों.



भाग पांचवा समाप्त.