पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतिवियोग.
[४९] 


 मल्हाररावांनी आपल्या प्रिय स्नुषेच्या तोंडातले हे शब्द ऐकिले मात्र, तोंच त्यांच्या काळजाने ठाव सोडिला ! आपण कोण व करितों काय याचे त्यांस भान न राहून त्यांनी एकदम तिच्या गळ्याला मिठी मारिली व दुःखाच्या हुंदक्याने तिला ते ह्मणाले, "अहल्ये, बाई, हा काय गे तूं असला विचार मांडिला आहेस ? माझा पुत्र तर गेलाच, आणखी त्याच्या बरोबर आतां तूंही जाऊन मला उघडा करतेस काय ? या तुझ्या माताऱ्या सासूसासऱ्यांकडे पहा. तूं असलीस तर, अहल्या नाही, आमचा खंडेरावच जिवंत आहे असे आह्मी समजू, तर असे करून तूं आणखी आह्मांला शोकांत लोटू नको, व ह्या तुझ्या अर्भकांना अनाथ करूं नको'.

 याप्रमाणे अंतःकरणाच्या खऱ्या कळवळ्याने सुभेदारांनी वरील भाषण केले व दुसऱ्या सर्व लोकांनी तिला तसेंच सांगितले, तरी तिचा निश्चय फिरतां दिसेना. ' पतीच्या मागें या भयाण झालेल्या जगांत आतां माझी राहण्याची शोभा नाही. माझी ही दुःखद स्थिति पाहून पुढे तुमच्या दुःखांत आणखी भर पडेल, असे ती मोठ्या नम्रतेने सासऱ्यास ह्मणाली; तेव्हां मल्हाररावांचें धैर्य खचून त्यांनी कपाळावर हात मारिला व ते पुनः ह्मणाले,' अहल्ये, तूं असा अविचार केलास तर त्याचा परिणाम मला भोगावा लागणार. तूं गेल्यावर माझें या जगांत कांहीं राहिले नाही. मीही तुझ्यामागे अग्निनारायणास आपल्या देहाची आहुति देणार हे खचित समज.'

 आपल्या सासऱ्याचे हे निर्वाणीचे शब्द ऐकुन बिचाऱ्या