पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४६]
भाग पांचवा.


तेही दुःखाने चूर होऊन गेले होते; तथापि त्यांनी प्राप्तप्रसंगाचा विचार करून सुभेदारांच्या डोळ्यांस पाणी लावून सावध केलें; व दोन सामोपचाराच्या गोष्टी सांगून त्यांचा शोक कमी केला.

 पण इतक्यांत दुसरा आकांत जो त्यांच्या पुढे दत्त ह्मणून उभा राहिला त्याचे कोठवर वर्णन करावें ? खंडेरावाच्या मृत्यूची वार्ता सुभेदारांच्या कुटुंबांत जाऊन पोचतांच त्यांची माता गौतमाबाई व पत्नी साध्वी अहल्याबाई हृदय पिटीतच तेथे आल्या. आपल्या पुत्राचे शव बघतांच एकाद्या दीन गाईप्रमाणे गौतमाबाईने मोठ्याने हंबरडा फोडला व त्याचे गुण आठवून ती आक्रोश करूं लागली ! माताच ती ! तिच्या प्रेमाची बरोबरी दुसऱ्या कशालाही येणार नाही !

  आतां साध्वी अहल्येचा शोक कसा होता तो ऐकावा!तो भयंकर देखावा बघतांच तिच्या डोळ्यांवर एकदम अंधारी आली व मी खोल पातालांत जाऊन पडले की काय असे तिला वाटलें ! मी आहे कोठे व करते काय याचं तिला भानच राहिले नाहीं ! ती आपल्या पतीचें शव मांडीवर घेऊन धाय मोकलून रडू लागली ! आज माझ्या सौख्याचा शेवट झाला ! माझा आशावृक्ष दग्ध झाला ! माझा प्राण मला सोडून गेला !!" असे ह्मणत ती थडाथड जमीनीवर डोके आपटून घेऊ लागली व पतीच्या नाशास कारण झालेला जो सुरजमल्ल त्याला संतापाने शाप देऊ लागली.

 या जमांत निदान आमच्या हिंदुस्त्रियांना तरी पति