पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतिवियोग.
[४५]


लहानाचे मोठे केले; व ज्यास सुशिक्षित करून इहलोकी कीर्ति संपादण्याचा मार्ग दाखवून दिला;ज्याचे उत्तम गुणवती स्त्रीशी लग्न करून उभयतांचा संसार सुखावह होईल अशी योजना केली;ज्याच्य कल्याणाकरितां,आपणास मातारपण आले असतांही लढाईवर जाण्यास सिद्ध झालों, तो आपला खंडेराव आतां कर्ता झाला आहे,तर मी आरंभिलेले कार्य आपल्या शिरावर घेऊन मला वृद्धपणी सुख देईल, अशी ज्याविषयी दृढ आशा आपल्या हृदयांत घट्ट धरून ठेविली होती तो एकाएकी आपल्या समक्ष निर्दय काळाने ओढून नेला हे पाहताक्षणीच सुभेदारांचे सर्व धैर्य खचून ते धाडकन् जमिनीवर पडले ! रणांगणांत ते प्रतिभीष्माचार्याप्रमाणे शूर होते व त्यांनी हजारों शत्रूस समरांगणी कंठस्नान घातले होते; पण या वेळी ते एकाद्या दीन मनुष्याप्रमाणे पुत्राविषयी विलाप करू लागले. 'माझा मूर्तिमंत मनोरथच आज भंग पावला ! माझा प्रिय पुत्र मला शोकसागरांत टाकून निघून गेला ! जो मी मेल्यावर माझी क्रिया करील व श्रांद्धांजलिदानाने स्वर्गलोकी माझ्या आत्म्यास संतुष्ट ठेवील अशी ज्याची मला आशा होती त्याचीच क्रिया मला स्वतःला करण्याचा आज दुष्ट दैवाने प्रसंग आणिला अं!' खरोखर पुत्रमोह फार काठिण आहे ! त्याच्या दुःखासारखे दुसरें दुःख नाही. तशांत मल्हाररावांस हा एकुलता एकच पुत्र होता ! मग त्यांच्या दुःखास काय विचारावें ! ते या असह्य दुःखाच्या भाराखाली दडपून जाऊन बेशुद्ध होऊन पडले. जवळ दादासाहेब व शिंदे वगैरे पुष्कळ सरदार होते, पण ते काय करणार ! खंडेरावांच्या आकस्मिक मरणामुळे आपल्या कुटुंबांतीलच एक कर्ता पुरुष गेला असे त्यांस वाटून