पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतिवियोग.

[४३]


करून आपल्या सैन्याचा तळ जवळ कुंभेरी ह्मणून एक गांव आहे तेथे दिला, व तेथील किल्ल्यास मोर्चे लाविले. इकडे सुरजमल्लानेही आपल्या सर्व फौजेची चांगली तयारी करून किल्याचे रक्षण करण्याकरितां तिची रवानगी केली. याप्रमाणे तयारी होतांच दोन्ही पक्षांतील लोकांनी लढाईस प्रारंभ करून एकमेकांवर गोळागोळीचा मारा सुरू केला !

 मनुष्य एक चितिते, पण होणाऱ्या गोष्टी काही निराळ्याच असतात. व त्या कितीही मानवी प्रयत्नाने टळल्या जात नाहीत हें उघडच आहे. सर्वच गोष्टी जर मानवी प्रयत्नाने टळतील, तर मग मनुष्यांत आणि परमेश्वरांत भेद तो काय राहिला ? या मोहिमेंत सहसा लढाईचा प्रसंग येणार नाही असे सुभेदारांना वाटून त्यांनी आपले सर्व कुटुंब बरोबर घेतले होते खरे; पण ईश्वरी नेमानेम काही निराळाच होता. होळकरांच्या राज्याचा पुढे होणारा अधिपति या मोहिमेंत पतन पावून सुभेदारांच्या कुटुंबांत हाहाकार व्हावयाचा होता, तो परमेश्वरसत्तेने व आमच्या नायिकेच्या दुर्दैवाने घडून आला यास कोणाचा काय उपाय ?

 जाटांशी मराठ्यांची लढाई सारखी दीड महिना चालली होती; हे मोर्चे लावून किल्ल्यावर नेहमी हल्ला करीत होते; व . शत्रूकडचे लोक यांच्याशी टक्कर देऊन आपले रक्षण करीत होते. अशांत एके दिवशी दुपारचे भोजन वगैरे आटपल्यावर सुभेदारांचे चिरंजीव व आमच्या चरित्रनायिकेचे पति मोचीत पेशव्यांचे जे निशाण लाविलेले होते तेथे सहज जाऊन युद्धचमत्कार पहात उभे होते, इतक्यांत साध्वी अहल्याबाईच्या