पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग पांचवा.
[४२]


रजवाड्यांकडून पाहुणचार वेत व खंडणी वसूल करीत चालली. सुभेदारांनी आपल्या कुटुंबांतील सर्व मंडळी बरोबर घेतली होती ह्मणून वर सांगितलेच आहे. तींत अहल्याबाई ही होतीच.तिची या वेळी सर्व संस्थानिकांच्या कुटुंबांतील स्त्रियांशी ओळख झाली. या साध्वीच्या सद्गुणांची सर्वत्र होत असलेली वाहवा त्या संस्थानिकांच्या स्त्रियांनी पूर्वीच ऐकिली होती, व तेव्हापासून एकवार अशा मुशील स्त्रीशी आपला चार दिवस सहवास घडावा अशी प्रत्येकीला इच्छा झाली होती; तो योग या वेळी अनायासें घडून आल्यामुळे त्यांनी अहल्याबाईचे योग्य स्वागत करून तिजशी मित्रत्व जोडिले व आपल्या घरीं चार दोन दिवस तिला राहवून घेऊन तिच्या समागमाचा लाभ मिळाल्यामुळे आपणांस धन्य मानिलें!

 असो. अशाप्रकारे श्रीमंत दादासाहेब फौजेनिशी उत्तरेस भरतपुर ह्मणून जाट लोकांचे प्रबळ संस्थान होते त्याच्या संनिध प्राप्त झाले व त्यांनी तेथील राजा सुरजमल यास खंडणी देण्याविषयीं नाहींतर युद्ध करण्याविषयी निरोप पाठविला.

 सुरजमल्ल हा चांगला फौजबंद होता व त्याच्या जवळचे सरदार मोठे लढवय्ये होते; तथापि श्रीमंतांचे सामर्थ्य तो जाणत असल्यामुळे लढाई करण्याचे त्याच्या मनांत येईना. त्याने वकिलाबरोबर, चाळीस लक्ष रुपये खंडणी देतो, असे श्रीमंतांस सांगून पाठविले; पण ते त्यांस मान्य न होऊन त्यांनी एक कोट रुपये खंडणी मागितली. सुरजमल्ल इतकी रक्कम देण्यास कबूल होईना; तेव्हां त्याच्याशी लढाई करण्याचा दादासाहेबांनी बेत