पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संसारसुख.

[३९]


आनंदाने दवडिले; पण आता मात्र ते सर्व वारें फिरून पर्वताप्रमाणे दुःसह दुःख सहन करण्याचा व वारंवार आलेल्या भयंकर संकटांस धैर्याने पाठ देऊन व स्वतःच्या शहाणपणाने त्यांचे निवारण करून भवितव्यतेशी झगडण्याचा प्रसंग साध्वी अहल्याबाईवर तिच्या दुर्दैवाने आणिला; तो कोणता, कसा आला व त्याचा परिणाम काय झाला हा सर्व वृत्तांत या आनंदाच्या भागांत न आणतां पुढल्या भागांवर टाकितों .

भाग चवथा समाप्त.