पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संसारसुख.

[३७]


तें पहा. लग्नापूर्वी आपल्या पंतोजीकडून सीता, द्रौपदी, दमयंती वगैरे साध्वी स्त्रियांची चरित्रे, जी तिने ऐकून अंतःकरणाशी घट्ट धरून ठेविली होती, त्यांच्याच अनुरोधाने तिने त्याच्याशी आचरण ठेवून आपणास सुखी मानिले. पति हा केवळ आपलें दैवत आहे असे मानून कायेनें, वाचेनें, व मनाने त्याच्या आज्ञेचा भंग करण्यास ती साध्वी कधी प्रवृत्त झाली नाही. खंडेरावास शिकारीचा फार शोक असे व ती करण्याकरितां तो नित्य सकाळीच उठून जंगलांत जाई, तो दोन प्रहर होत तोपर्यंत परत येत नसे; पण अहल्याबाईनें तो येऊन त्याचे जेवण झाल्याशिवाय कधी भोजन तर काय पण पाण्याचे आचमनदेखील घेतले नाही. याहून आणखी पातिव्रत्य विशेष ते कोणते राहिलें ? आणि अशा शुद्ध प्रेमानें व धर्माचरणाने ज्याची स्त्री वागते आहे त्यास सतत आनंद आणि सुख यांची प्राप्ति झाल्यास त्यांत अधिक ते काय झाले ? अशा स्त्रीची योग्य परीक्षा करून तिला निरंतर संतोषित ठेवण्यास जो पति तनमनधनेंक रून झटतो तोच या जगांत धन्यता मिळवितो, व त्यावरच परमेश्वर पूर्ण कृपा करितो ! खंडेरावाने ह्या दोन्ही संपादन केल्या. आपल्या स्त्रीच्या स्वभावाची योग्य परीक्षा करून त्याने तिजशी प्रेमाचरण ठेविलें व आमरण एका कठिण शब्दानेदेखील तिचे मन दुखविले नाही.

 या सुशील दंपत्याचे परस्परांवर अधिक प्रेम करण्यांत दिवस चालले असता दोन वर्षांनंतर अहल्याबाई गरोदर होऊन पुत्र झाला, त्याचे नांव मालीराव ठेविले. त्यावर खंडेराव व अहल्याबाई यांची अत्यंत प्रीति असे. पतीचे कधीं