पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लग्नसमारंभ.

[३१]


रांत पडून तो लग्नसमारंभ तर आटपला, व तेणेकरून आनंदरावाचे व त्याच्या स्त्रीचे डोळे आनंदाश्रूनी भरून आले. आतां या भागाच्या शेवटी इतकेंच सांगावयाचे राहिले आहे की, अहल्येचे लग्न झाल्यावर तिच्या आईबापांनी लवकरच इहलोकची यात्रा आटपली ! अहल्येची पुढे जी कीर्त झाली ती ऐकण्यास त्यांस परमेश्वराने जिवंत ठेविले नाही, त्याने त्यांवर मोठी कृपाच केली असें झटले पाहिजे; नाही तर पुढें आपल्या प्रियकन्येवर आलेले एकामागून एक दुःखाचे प्रसंग ऐकून त्यांपेक्षा त्यांस मरणच प्रिय झाले असतें! निदान आपल्या दुःखमय स्थितीत त्यांचे दुःख पाहून अहल्येला तरी तसे वाटले असते !





भाग तिसरा समाप्त .