पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३०]
भाग तिसरा.


आपणाजवळ आणण्यास सांगितल्यावरून लागलेंच मल्हाररावांनी खंडेराव व अहल्याबाई यांस आणून छत्रपतींच्या पायांवर घातलें, नंतर त्यांनी त्या दोघांस मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून व समयोचित त्यांची किंचित् थट्टा करून त्यांच्या तोंडांत साखर घातली. याचें नांव दैव ! नाही तर कोण खंडेराव ! धनगराचा मुलगा ! कोठे तरी मेंढ्या राखीत रानांतून हिंडावयाचा व तशीच अहल्या त्याच्या पाठोपाठ भटकावयाची! पण सुदैवाच्या बळाने ती छत्रपतींच्या मांडीवर बसण्यास योग्य झाली ! असो. छत्रपतींनी प्रारंभ केल्यावर इतर सर्व मानकऱ्यांनी त्याचप्रमाणे करून त्या जोडप्यास पुढील मंगलविधीकरितां उपाध्याबरोबर लग्नगृहांत पाठविलें.

 यानंतर तुकोजी होळकराने सर्वांस विडे, हारगजरे वगैरे दिल्यावर प्रहरभर कलावंतीणींचे मनोहर नृत्यगायन होऊन छत्रपती व त्यांच्या मागून सर्व राजेरजवाडे मंडपांतून निघून गेले. नंतर मल्हाररावांनी कलावंतिणींना योग्य बक्षिसे देऊन त्यांची संभावना केली.

 दुसरे दिवशी लग्नसमारंभ आटपल्यावर सुभेदारांनी आपल्या सर्व नातेवाईकांस व राजेरजवाड्यांस मोठी टोलेजंग मेजवानी दिली व नंतर त्यांस जाण्यास निरोप दिला. मल्हाररावांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा होय. लग्न झाल्यावर त्यांनी आपल्या पुत्रास व स्नुषेस खंडोबाच्या दर्शनास नेऊन परत आणिलें व नंतर लवकरच श्रीमंतांची आज्ञा घेऊन माळवा प्रांतांतील आपली राजधानी जी इंदूर तेथे प्रयाण केले.

 ज्योतिष्याने भविष्य केल्याप्रमाणे अहल्या संस्थानिकाच्या घ-