पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लग्नसमारंभ.

[२९]


अहल्या कसें ह्मणावें ? ती अहल्याबाई होळकरीण झाली-थाट काय विचारावा ! मस्तकावरील, गळ्यांतील, हातांतील व पायांतील सर्व अलंकार घातल्यामुळे ती प्रत्यक्ष एकाद्या देवतेप्रमाणेच दिसू लागली. वरातीच्या वेळी खंडेरावाने डोक्याला भरजरी पगडी घातली होती व त्याच्या अंगांत जरीचा अंगरखा असून पायांत तुमानही त्याच प्रकारची होती. हातांत कडींतोडे व गळ्यांत मौल्यवान् हिन्यांची कंठी शोभत होती ! खंडेराव व अहल्याबाई यांची वरात मोठ्या थाटाने सर्व शहरभर मिरविल्यानंतर गंगाधर यशवंत याने घातलेल्या भव्य मंडपासंनिध येऊन थडकली !

 या वेळी मंडपांत जी विलक्षण शोभा दिसून येत होती तिचे वर्णन किती करावे ? मंडपाच्या मध्यभागी श्रीमंत शाहू छत्रपति एका उच्च सिंहासनावर विराजमान झाले असून त्यांच्याजवळ त्यांचे मुख्यप्रधान श्रीमंत नानासाहेब पेशवे बसले होते, व डाव्याउजव्या दोन्ही अंगांस निमंत्रणावरून लग्नसमारंभास आलेले सर्व राजेरजवाडे आपापल्या योग्यतेप्रमाणे बसले होते. मंडपांत अनेक प्रकारच्या रंगारंगांच्या हंड्या आणि झुंबरे लाविली असून त्यांचा प्रकाश शांत व नेत्रांस आनंददायक असा पडला होता. हिंदुस्थानांतल्या नामांकित कलावतिणीचे ताफे नृत्यगायन करण्याकरितां उभे होते. सोनेरी वर्खाच्या विड्यांची व सुवासिक पुष्पांच्या हारगजऱ्यांची ताटें तसेच अत्तरदाणी व गुलाबदाणी हातांत घेऊन अनेक माणसे ते देण्याच्या ईषाऱ्याची वाट पहात होते.

 नवरानवरीची वरांत सर्व शहरभर मिरवून मंडपापाशी आलेली कळल्यावर श्रीमंत छत्रपतींनी त्या नूतन विवाहित दंपत्यास