पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग दुसरा.

[९]


रहात असे. बाजारपेठ प्रथम मुळीच नव्हती; पण येथून मोगलांचा मुलूख अगदी जवळ असल्यामुळे श्रीमंतांनी आपल्या बऱ्याच मोठ्या फौजेची छावणी येथे केली होती तिच्या योगाने थोड्याच दिवसांत बरीच वाण्याची आणि धान्यवाल्यांची दुकाने तेथे होऊन गेली. याशिवाय मारुती, विष्णु, शिव यांची चार पांच देवळे व एक लहानशी शाळा ही तेथे होती.

 त्या वेळी तेथें आनंदराव शिंदे ह्मणून कोणी धनगर आपल्या थोड्या बहुत असलेल्या शेतीभातीवर निर्वाह करून रहात असे. त्याचा स्वभाव जात्या परोपकारी असून त्यासारखीच त्याला सुदैवाने स्त्री मिळाली होती. उभयतांनी एक विचाराने आपल्या आयुष्याचे बरेच दिवस संसारांत काढिले; पण त्यांस संतानलाभ झाला नाही. तथापि हे देणे केवळ परमेश्वराधीन, यास मानवी प्रयत्न व्यर्थ होत असा विचार करून आनंदराव आपल्या असत्या स्थितीत सदा समाधानी असे; परंतु त्याच्या स्त्रियेच्यासंबंधाने अगदी उलट प्रकार होता. आपल्या बरोबरीच्या चार बायकांची मुलेबाळें त्यांच्या कडेवर खेळत असलेली पाहून तिला तद्विषयी असलेल्या आपल्या दैवहीनतेचा फार खेद वाटे; व ती वारंवार पतीस अपत्यप्राप्तीसाठी काही दैविक उपचार करण्याविषयी आग्रह करी. आणि इतकंच करून ती राहिली नाही, तर तत्प्राप्तीसाठी तिला कोणी जे जे उपाय करावयास सांगितले–मणजे मुंजाबाला लाख प्रदक्षिणा घालावयाच्या, जेजुरीच्या खंडोबाला तोळ्याचा सोन्याचा करगोटा करून वहावयाचा-ते सर्व तिनं करून पाहिले परंतु त्यांपासून बरेच दिवस तिचे इच्छित