पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेवटचे भयंकर दुःख.

[ १५१ ]


णाची हानि करून घेतली असती. असो. इकडे असा प्रकार चालला आहे तो तिकडे चितागृहाची पार रक्षा होऊन गेली व ती बाईसाहेबांनी पाहतांच त्यांचे सर्व वेड एकदम नाहीसे होऊन त्या इतक्या शुद्धीवर आल्या की, आता मला काय करावयाचें ते सांगा असें ब्राह्मणांस ह्मणाल्या. नंतर ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे नर्मदा नदीत उतरून त्यांनी स्नान केले व शास्त्रांत सांगितलेली त्यानंतरची और्ध्वदेहिक कृत्ये, जी त्यांनी करावयास सांगितली ती सर्व त्यांनी मोठ्या आस्थेने केली; व तो सर्व विधि आटोपल्यावर, त्या जरी मनांत अतिशय उदासीन झाल्या होत्या तरी वरकांती मोठा गंभीरपणा धारण करून आपल्या लोकांबरोबर घरी आल्या. घरांत पाय ठेवतांच एकाएकी त्यांच्या हृदयांत भडभडून आले. व त्या एकांत स्थली जाऊन बसल्या. तेथें तीन दिवसपर्यंत त्या तशाच शोकाकुल स्थितीत राहिल्या. त्या तीन दिवसांत त्यांनी कांहीं देखील खाल्लं नाही व झोंपही घेतली नाही.

  त्या नंतर आपल्या निस्सीम प्रेमास्तव ज्या ठिकाणी मुक्ताबाईने आपला देह अग्नीस अर्पण करून आपलें कडकडीत पातिव्रत्य जगास दाखविलें त्या ठिकाणी बाईसाहेबांनी पुष्कळ द्रव्य खर्च करून अतिशय सुंदर असें एक देऊळ तिच्या नांवाने बांधिले. हे त्यांनी केलेले कन्येचे स्मारक अद्यापि कायम असून ते इतके उत्तम आहे की त्याच्या तोडीचें देऊळ सर्व हिंदुस्थानांत क्वचितच कोठे आढळेल.

 साध्वी मुक्ताबाईचा अशा रीतीने झालेला अंत हे बाईसाहेबांचे शेवटचे दुःख होय. यापुढे आणखी दुःखाचे प्रसंग