पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १५० ]
भाग चौदावा.


बाईसाहेबांनी मोठे धैर्य धरिलें होतें खरें; पण जेव्हां त्या गृहांतून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघालेल्या दृष्टीस पडल्या तेव्हां त्यांची सर्व शुद्धि पुनः नष्ट झाली व आपल्या प्रिय कन्येला ' मुक्ताबाई, तूं कोठे आहेस, मला एकवार तरी भेटकीं ग ' अशा वारंवार हांका मारून त्या मोठ्याने विलाप करूं लागल्या व ते पाहून इतर लोकांच्या नेत्रांवाटेंही एकसारख्या दुःखाणूंच्या धारा वाहूं लागल्या. या वेळी बाईसाहेबांच्या ठायीं इतकें कांहीं कन्यावात्सल्य उत्पन्न झाले होते की, आपल्या लाडक्या मुलीचा वियोग आतां आपणास सहन होणें नाहीं, ह्मणून तिच्यामागून आपणही त्या अग्निकुंडांत आपल्या देहाची आहुति द्यावी असा त्यांच्या मनांत- विचार येऊन त्या चितागृहाकडे धावू लागल्या; पण जवळच्या दोनचार ब्राह्मणांनी त्यांना घट्ट धरून जागच्याजागी मोठ्या प्रयासाने थांबविले; तरी त्या त्यांच्या हातांतून सुटण्याचा प्रयत्न करीत होत्या आणि वेड्यासारख्या होऊन आपल्या अंगास मोठमोठ्याने आळेपिळे देत होत्या, व आपणास धरणाऱ्या ब्राह्मणांना प्रथम अधिकाराने व नंतर प्रार्थनेने सोडण्याविषयी सांगत होत्या. पण ते स्वामिनिष्ठ ब्राह्मण त्यांस सोडून तसे कसे करूं देणार ? एकटी आपली मुक्ताबाईच आपणास आई ह्मणणारी नसून. सर्व लोकही आपणास मातेप्रमाणे मानितात हे त्या वेळी जरी त्या विसरून गेल्या होत्या तरी कोणालाही त्याचा विसर पडला नाही आणि खचितच या वेळी त्यांस लोकांनी आवरून धरिलें ह्मणून आणखी काही दिवस त्या या जगांत राहिल्या; नाही तर त्या वेळी त्या प्रेमातिशायाने इतक्या बेफाम होऊन गेल्या होत्या की, मुक्ताबाईच्या मागून त्या जळत्या चितेत त्यांनी आपल्या प्रा-