पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेवटचे भयंकर दुःख.

[ १४९ ]


बाईसाहेबांच्या मनाची पूर्ण खातरी होऊन चुकली. मग निरुपायास्तव आपल्या प्रियकन्येच्या देहावसानाचा तो शेवटचा भयंकर देखावा स्वतः डोळ्यांनी पाहण्याचा त्यांनी निश्चय केला तरी जेव्हां त्यांच्या जावयाचे प्रेत वाड्यांतून बाहेर काढिले व त्याबरोबर मुक्ताबाई शांतवृत्तीने चालू लागली तेव्हां त्यांच्या निश्चयाचा अंमल त्यांच्या देहावर चालेना. त्यांचे हातपाय अगदी गळल्यासारखे होऊन त्यांस बसल्या जागेवरून उठवेना; तथापि दोघां ब्राह्मणांनी दोहों बाजूनी त्यांस धरिल्यावर त्या आपल्या कन्येमागून चालू लागल्या. मग मोठ्या राजकीय समारंभाने ते प्रेत स्मशानांत आणिलें, व तयार केलेल्या चितागृहामध्ये त्याची स्थापना केली. नंतर सती मुक्ताबाईनें धर्मशास्त्रांत सांगितलेली त्या वेळची सर्व कृत्ये मोठ्या आनंदाने केली, आपल्या मैत्रिणींना सौभाग्यवायनें देऊन त्यांचा निरोप घेतला व ब्राह्मणांस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळविले.चितागृहांत प्रवेश करण्याचे वेळी तिने आपल्या मातेची प्रेमाने शेवटची भेट घेऊन तिच्या चरणांवर मस्तक ठेविलें. बाईसाहेबांनीही त्या वेळी सर्व दुःख एकीकडे ठेवून तिला आनंदाने आशीर्वाद दिला. नंतर मुक्ताबाईने त्या चितागृहांत प्रवेश करून आपल्या पतीच्या शवास प्रेमालिंगन देऊन आपल्या हाताने त्या गृहास अग्नि लाविला. घटका लोटली नाही तोंच त्यांतून मोठमोठ्या भयंकर ज्वाला निघून त्या प्रेमबद्ध व धार्मिक तरुण दंपत्याच्या देहांची त्यांनी रक्षा करून टाकिली!

 मुक्ताबाईस आशीर्वाद देते वेळी व ती चितागृहांत शिरली त्यावेळी