पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेवटचे भयंकर दुःख.

[१४७ ]


ते बरोबर आहे; पण तूंच विचार कर की, हल्ली तुझें म्हातारपण झाले आहे. आणखी थोडक्याच दिवसांत या तुझ्या धार्मिक आयुष्याची समाप्ति होईल. माझे आवडतें एकुलते एक लेकरूं तर यापूर्वीच यमाच्या घरी गेलें आहे, आणि माझ्या सुखाचा सारा ठेवा जो माझा पति तो आज मला अंतरला. आतां तुझ्या ह्मणण्याप्रमाणे मी या जगांत राहिले तर तुला चार दिवस मुख होईल व तुझी मर्जी न मोडल्यामुळे मलाही तोपर्यंत समाधान वाटेल; पण पुढे तूंही जेव्हा मला सोडून जाशील तेव्हां दुःखाने हा जीव मला जड होईल व सौभाग्य बरोबर घेऊन जाण्याची जी आज अमूल्य संधि आली आहे ती पुढे कधी येणार नाही. यासाठी माझ्या सती जाण्याच्या निश्चयाच्या आड तूं येऊ नकोस.' आपल्या मुलीच्या तोंडातून असे शांतपणाचे निघालेले उद्गार ऐकून बाईसाहेबांच्या मनाची स्थिति चमत्कारिक होऊन गेली. कोणाच्या धर्मकृत्यांत आड येऊन त्याच्यावर जुलूम करण्यास त्यांस परमेश्वराचे फार भय वाटत असल्यामुळे एकीकडे आपल्या मुलीस सती जाऊ नकोस असें सक्तीने सांगणे त्यांस बरे वाटेनावदुसरीकडे त्यांच्या अतिशय कन्यावात्सल्यामुळे विधि तिचा सहगमन आपल्या डोळ्यांनी पाहण्यास त्यांस धैर्य होईना. अशा प्रकारच्या दोन्ही विचारांनी त्यांचे मन गोंधळून गेले आहे तोच मुक्ताबाईने सती जाण्याचाच आपला निश्चय कायम केला असे त्यांच्या दृष्टीस पडले. तिने मंगलस्नान करून सती जाण्याची वस्त्रे परिधान केली. आपल्या अंगावरचे सर्व अलंकार सुवासिनींना वाटले; व केस मोकळे सोडून साऱ्या कपाळभर कुंकवाचा मळवट भरिला आणि गळ्यांत कापुराच्या माळा घातल्या. इतकी सर्व तयारी करून ती आप-