पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेवटचे भयंकर दुःख.

[१४३ ]


थोडेसें—-सुखाचे तर नाहींतच-पण दुःखवर्णनविरहित असे भाग तुमच्या दृष्टीच पडतांच तुह्माला पुनः उमेद आली व ते मोठ्या उत्कंठेने तुह्मी वाचून प्रथम आपल्या मनास आलेला शीणही नाहींसा केलात. पण हे चरित्रच जर मूळचें दुःखरूप व हृदयद्रावक आहे तर ते पुनः तुह्मांस दुःख वर्णनाच्या भागाचे दर्शन देऊन ती तुमची क्षणिक उमेद नाहींशी केल्याशिवाय कसे राहिल? पण तसे झाले तरी करावयाचे काय ?' विधात्याची अतर्व्य लीला व बाईसाहेबांचे त्या प्रसंगीचे लोकोत्तर धैर्य ही समजून घेण्याकरितां तुह्मांस ते शेवटपर्यंत वाचणे भाग आहे. त्याबद्दल तुम्ही मनांत कितीही हळहळलां व चरित्रकारास दोष दिला, तरी ओघाने आलेला तो दुःखकारक प्रसंग त्यास तसाच टाकून पुढे जातां येत नाही. तर प्रियवाचहो, मागें रमाबाई सती जाण्याच्या वेळी त्याप्रसंगाचे वर्णन तसेंच बाजूला ढकलून आम्ही चरित्रभाग पुढे लिहावयास लागल्यामुळे तुमचा हिरमोड झालेला होता; तर आतां मन घट्ट करून तो सतीचा भयंकर देखावा बघण्यास तयार व्हा. त्यावेळी तुम्हांस वचन देऊन आम्ही आपणांस बांधून घेतल्याप्रमाणे आतां तो दाखविण्यास प्रारंभ करितों.

 अहल्याबाईसाहेब आपल्या पतीसह सुखांत असतां त्यांस दोन अपत्यें--एक पुत्र व एक कन्या-झाली होती. पुढे त्यांस पतीचा वियोग झाल्यावर पुत्र मालिराव यास काही काळ होळकरांच्या गादीचा उपभोग मिळून त्याच्या दुर्वर्तनाने अथवा बाईसाहेबांच्या दुर्दैवाने त्याचा कसा परिणाम झाला ही सर्व हकीकत यापूर्वीच वाचकांनी वाचलेली आहे. आतां काय ती