पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १३८ ]
भाग तेरावा.


नौकर लोकांस त्या मोठ्या ममतेने वागवीत; तरी एकादे वेळी त्यांस राग आला असतां त्या इतकें उग्र स्वरूप धारण करीत की, त्यांच्या अगदी सलगीच्या मंडळीपैकीं देखील कोणास त्यांच्या जवळ जाण्यास धैर्य होत नसे. या शिवाय त्यांस असत्याचा इतका तिटकारा असे की, तसे भाषण करणा-या मनुष्यावर एक वेळ त्यांची गैरमर्जी झाली की त्यांना प्रसन्न करून घेण्याची कधी त्याने आशाच करूं नये. तसेच त्या जात्या स्त्री असतांही त्यांच्या ठायीं अमानुष धैर्य होते; यामुळे कसलेही संकट आले तरी न डगमगतां त्या त्यांचे निवारण करीत. मल्हारराव होळकरांची सून ह्मणवून घेण्याचा त्यास मोठा अभिमान असे ह्मणून त्यांस कांही कृत्य करण झाल्यास दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी न पितां तें त्या आपल्या स्वतःच्या हिमतीवर करीत.

 ब्राह्मणांविषयी बाईसाहेबांच्या अंतःकरणांत अत्यंत पूज्यबुद्धि असून त्यांच्यावर त्यांनी आपला सर्व विश्वास टाकिला होता. परराज्याशी पत्रव्यवहार, वसुलाचा जमाखर्च व दानधर्माच्या पैशाचा विनियोग इत्यादि सर्व गोष्टी त्या त्यांच्याकडून करवीत. ब्राह्मणांनीही या त्यांच्या विश्वासाचा कधी दुरुपयोग केला नाही.

 गोब्राह्मणप्रतिपाल करण्याविषयी सर्व हिंदु राजांस आपल्या धर्मशास्त्राचीच आज्ञा असल्यामुळे बाईसाहेबांनी जसे ब्राह्मणांचे संरक्षण केले तसेच गाईचेही केले. त्यांच्या राज्यांत कधीं गोवध तर झाला नाहींच; पण परराज्यांतही तो न