पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[१३७]

त्यांचें नांव पूज्य झाले आहे तितकें त्याने झाले असते असें आपणास वाटते काय ? या ब्राह्मणाच्या भाषणाने मालकमसाहेबांचे जसें समाधान झालें तसे आमच्या वाचकांचेही होईल अशी आमची खातरी आहे. बाईसाहेबांनी परराज्यांत व स्वराज्यांत भूतदयेची कृत्ये करण्यांत जो एवढा अजस्त्र खर्च केला तो करण्यांत त्यांच्या जिवाचा लाडका हेतु आपली प्रजा इतर बलिष्ठ राजांपासून निर्भय राहून आपल्या अधिकाराखाली न्यायाने व आनंदाने आपल्या दौलतीचा उपभोग घेत रहावे हाच होता. या त्यांच्या स्तुत्य उद्देशाबद्दल त्यांची प्रशंसा कोण करणार नाही ?

 यानंतर आह्मी बाईसाहेबांच्या स्वभावाविषयी दोन शब्द लिहिण्याकडे आपली लेखणी वळवितो. इतर चरित्रकारांची पद्धत चरित्राच्या शेवटी स्वभाववर्णन करण्याची असते, पण तें येथेच करणे आह्मांस अधिक प्रासंगिक होईल असे वाटते. बाईसाहेब आपल्या सर्व प्रजेविषयी मातेप्रमाणे कळकळ दाखवीत असत, व सर्व प्रकारच्या धर्मकृत्यांत उदारपणाने पैसा खर्च करीत असत. तसेंच कोणा अपराध्यास शिक्षा करणे ती त्याच्या अपराधाप्रमाणे फार सौम्य करीत. ह्या सर्व गोष्टी ज्यांनी वाचिल्या असतील त्यांस त्या पराकाष्ठेच्या दयाळु असल्या पाहिजेत याबद्दल कधी संशय वाटणार नाही. त्या अंगाने फार उंच नव्हत्या व फार ठेंगण्याही नव्हत्या त्यांचा बांधा सडपातळ असून जरी अनेक संसारिक दुःसह दुःखांमुळे त्यांचे अंतर्याम उदास झालेले होते तरी त्यांचा चेहरा सदा आनंदित दिसे. आपल्या पदरच्या सर्व अधिकारी व