पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३५]
भाग बारावा.


सून त्यांत ब्राह्मण अवदाने टाकीत होते. तसेंच त्यांनी पुष्कळ तैलंग लोकांची लग्ने आपल्या खर्चाने करून देऊन नवरानवरींच्या वराती मोठ्या थाटाने मिरविल्या. तान्ह्या बालकांस त्यांनी दूध पुरवले. जे म्हातारे रोगी होते त्यांस औषधे व वस्त्रे मिळण्याची व्यवस्था करून दिली. ज्यांनी अग्निहोत्रे घेतली होती त्यांस ती नेहमी चालवितां येतील अशी मठ बांधून सोय लावून दिली. याशिवाय त्या सदा स्वधर्मातली सांगितलेली व्रते करण्यांत गर्क असत. नित्य ब्राह्मणांस इच्छाभोजन घालीत. कधी कोटिलिंगे करीत; नित्य पुराण ऐकत व हातांत जपमाळ घेऊन जप करीत. कोणी यात्रेकरू आले असतां कोणांस पंचे कोणांस जोडे कोणांस अंगरखे देऊन मार्गस्थ करीत. गरीबलोकांच्या यात्रेचा सर्व खर्च आपण देत. ग्रहणांच्यावेळी व इतर पर्वणीच्यावेळी कधी तेलातुपाच्या कधी गूळतिळाच्या व कधी सोन्यारुप्याच्या आपल्या तुला करून त्या ब्राह्मणांस वाटीत असत.त्यांच्या दानधर्मास मर्यादा ह्मणून कशी ती राहिलीच नव्हती. कोणी स्वतःच्या लग्नाकरितां, कोणी आपलें कांहीं व्रत उजविण्याकरितां, कोणी आपण बांधिलेल्या देवळास सभामंडप बांधून तेथे नंदादीप लावण्याकरितां अशा कोणत्याना कोणत्या तरी निमित्ताने नित्य त्यांच्याकडे येत व या उदारशील बाईसाहेब त्यांस संतुष्ट करून परत लावीत. त्यांची पुण्यकारक कीर्ति त्या वेळी सर्वत्र पसरून गेली असल्यामुळे एकाद्या साधूच्या दर्शनास जशा लोकांच्या झुंडींच्या झुंडी येतात तशा त्यांच्या दर्शनास येत व त्या योगाने आपले सर्व पाप नाहीसे झाले असे समजत. बाईसाहेबांनी आपला लौकिक वाढवून उभयकुळांचा उद्धार केला तसा कोणीही यापूर्वी केला नसेल व पुढेही कर-