पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३४]
भाग तेरावा.

पात्र झाली त्याप्रमाणेच शेतात काम करणारे बैल, रानांत फिरणारे पक्षी व नदीत राहणारे मच्छादि जलचर प्राणी यांनाही त्याचा लाभ झाला. उष्णकाळांत शेताची जमीन नांगरीत असतां असें वारंवार दृष्टीस पडे की, बाईसाहेबांचे नौकर लोक तेथें पाण्याची भरलेली भांडी घेऊन धांवत येत, व शेतकरी बैलांस पाणी पाजण्याकरितां आपले बैल थांबवीत. रानांत शेतकरी लोक पक्षांना हांकून लावतात ह्मणून केवळ त्यांच्याचकरितां त्यांनी निराळी शेतें राखून ठेविली होती. त्यामुळे तेथे सर्व प्रकारचे पक्षी आपलें भक्ष्य खाण्याकरितां नित्य जमत, व त्या वेळी एकाद्या पसरलेल्या भिन्नभिन्न लोकांच्या सैन्याप्रमाणे त्यांची मौज दुरून दिसत असे. नद्यांतील माशांस खाऊ घालण्याकरितां त्या दररोज पिठाच्या पुष्कळशा गोळ्या तयार करवीत व त्यांत रामनामाच्या चिठ्या घालून नंतर त्या नदीत टाकीत. बाईसाहेबांच्या या पद्धतीचे अद्यापही त्या प्रांतांतील लोकांनी अनुकरण केलेले पाहण्यात येते. महेश्वर वगैरे ठिकाणी अशा रामनामांकित पिठाच्या गोळ्या करून तेथील रहिवासी लोक नर्मदेवर येतात व त्या नदीत टाकून माशांची उड्या मारण्याची मौज पाहतात .

 अहल्याबाईसाहेबांच्या वेळी प्रख्यात असलेला प्रभाकर कवि याने त्यांच्यावर एक फार चांगला पोवाडा केलेला आहे, त्यांत तो असें ह्मणतो की, बाईसाहेबांसारखी धन्य माउली कलियुगांत एक देखील झाली नाही. त्यांनी अनेक वेळां ब्राह्मणांची सहस्रभोजने घातली; सालंकृत अशा हजारों गाई दान केल्या. त्यांच्या आश्रयाखाली महेश्वरास शेंकडों यज्ञकुंडे नेहमीं पेटलेली अ-