पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३२]
भाग तेरावा.


वांट ही दोन्ही कामें अत्यंत प्रेक्षणीय झाली आहेत, व त्यांस किती खर्च लागला असावा याचे अनुमानही करितां येत नाही. हा व इतर धर्मसंबंधी इमारतींचा सर्व खर्च त्यांनी आपल्या शिल्लक असलेल्या पैशांतून केला. त्याबद्दल लोकांवर किंचित्ही अधिक कर बसविला नाहीं; यासाठीच त्यांची ही कृत्ये आह्मी परोपकाराची समजतो. लोकांजवळून कराच्या रूपाने पैसा उकळून त्याने त्यांच्या सोईची कामें करणे ही कृत्ये परोपकाराची समजून ती करणाराची जे कोणी प्रशंसा करीत असतील ते खुशाल करोत. आह्मी तर ती कृत्ये ह्मणजे कावेबाजपणाची एक राज्यपद्धति असे समजतो.

 बाईसाहेबांची औदार्याची कृत्ये त्यांच्या अंतःकरणांत उद्भवलेल्या लोकोत्तर भूतदयेचा परिणाम होन, आणि ह्मणूनच ती त्यांच्याच केवळ राज्यामध्ये नसून हिंदुस्थानांतील साऱ्या भागांत पसरली आहेत. त्यांतली जी चिरकालिक आहेत त्यांचे वर्णन वर आलेच आहे. आतां दुसरी त्यांची धर्मकृत्य खर्चाची असून त्यांच्या हयातीनंतर नाममात्र राहिली अशी पुष्कळ आहेत. त्यांपैकी सर्वांत मोठे म्हणजे इसवी सन १७९० च्या सुमारास उत्तरहिंदुस्थानांत जो भयंकर दुष्काळ पडला होता त्यांत सांपडलेल्या मनुष्यांचे प्राण रक्षण हे होय. या दुष्काळाचे स्वरूप इतकें भयंकर होते की, त्यावेळी त्या प्रांतांत रुपयाला पायलीपेक्षा अधिक धान्य मिळत नव्हते, व तेथे बळी तो कान पिळी असा प्रकार चालू असल्यामुळे गरीब लोकांस त्याचाही लाभ होणे अशक्य झाले होते. त्या वेळी त्या प्रांतांतील सर्व लोक बाईसाहेबांच्या राज्यांत येऊन