पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
औदार्य आणि स्वभाव.

[ १३१ ]


त्ये केली आहेत त्यांची हकीकत त्यांच्या तीर्थयात्राप्रसंगी दिलीच आहे. त्याशिवाय त्यांच्या थोरपणाची मोठी व चिरकालिक स्मारके झटली म्हणजे महेश्वर येथे रेवानदीस घांट बांधून त्यावर जी त्यांनी आपली भव्य छत्री उभारली आहे व गयेस ज्या अनेक चांगल्या चांगल्या इमारती बांधिल्या आहेत हीं होत. या दोन्ही ठिकाणी लोकांस त्यांची सदैव आठवण राहण्याकरितां संगमरवरी दगडाच्या त्यांच्या प्रतिमा बसविल्या आहेत त्यांचे दर्शन तेथे जाणारे येणारे लोक आपल्या देवतेप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने घेऊन आपणास कृतार्थ मानितात. महासाधु कबिरांनी 'नर करणी करे तो नरका नारायण होय.' असे म्हांटले आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण अहल्याबाईसाहेब होत असें म्हटल्यावांचून आमच्याने राहावत नाही. फार काय सांगावें मानवयोनीत जन्म घेऊन आपल्या लोकोत्तर सद्गुणांनी व अखंड औदार्याने त्यांनी आपले नांव देवादिकांच्या मालिकेत गोवून घेतले त्यामुळे जातीच्या धनगर असून ब्राह्मणांसही त्या वंद्य झाल्या आहेत.

 परशत्रू पासून आपल्या राज्याचे उत्तम रीतीने रक्षण आपणांस करितां यावे ह्मणून पुष्कळ पैसा खर्च करून सरहद्दीवर ठिकठिकाणी त्यांनी किल्ले बांधिले. तसेच आपल्या अधिकारांतील लोकांस सुख व्हावें ह्मणून सर्व नद्यांस घांट बांधून सर्वत्र सडका, धर्मशाळा, विहिरी, तलाव, व देवळे यांची रेलचेल केली. या सर्वात नेमावरगांवीं त्यांनी बांधिलेलें खंडोबाचे देऊळ व जामच्या किल्ल्यापाशी जो विध्यपर्वताचा केवळ कडा उतरला आहे तेथें बांधिलेला