पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १३ वा.


औदार्य आणि स्वभाव.

 या आर्यावर्तातील असंख्य लोकांची पातके आपल्या पवित्रजलाने नाशाप्रत नेल्यामुळे, गंगा, यमुना, सरस्वती इत्यादि महानद्यांची कीर्ति आज हजारों वर्षे जशी सर्व जगभर पसरून राहिली आहे तद्वतच श्रीमंत अहल्याबाईसाहेब यांचे नांव, त्यांनी आपल्या अद्वितीय औदार्याने अनेक जनांची दुःखें हरण केल्यामुळे सर्वत्र पूज्य होऊन राहिले आहे. या त्यांच्या औदार्याचे समग्र वर्णन करण्यास आम्ही असमर्थ आहों; कारण, होळकरांच्या सर्व खजिन्यावर, त्याचा दानधर्माकडे विनियोग करण्याचा निश्चय करून हातांत तुळशीपत्र घेउन ब्राह्मण संकल्प सांगत असतां ज्यांनी पाणी सोडिले व त्या निश्चयाप्रमाणे त्याचा त्याच सत्कृत्याकडे व्यय केला त्या अहल्याबाईसाहेबांच्या औदार्याच्या ज्या लहानमोठ्या पुष्कळ गोष्टी आहेत त्या सर्वांचा समावेश या लहानशा चरित्रांत करता येण्यास अवकाश नाही व शिवाय त्यांची खरी माहिती मिळणे शक्यही नाही. यासाठी त्यांतील कांहीं, ठळक ठळक गोष्टी मात्र आम्ही येथे सांगतो.

 हिंदुस्थानांतल्या प्रत्येक तीर्थाचे ठिकाणी बाईसाहेबांनी धर्मशाळा, अन्नछत्र व देवस्थानास वर्षासन वगैरे जी सत्कृ-