पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परराज्यांशी वर्तणूक.

[१२९ ]


दिले की, मी तुह्यांस या अन्यायाच्या कामांत साह्य तर करणार नाहींच, पण माझ्या राज्यांत यापुढे राहिलांत तर माझ्या यजमानांचे शत्रु ते माझेच शत्रु असे समजून तुह्याला कैदेत मात्र ठेवीन. या त्यांच्या जबाबावरून त्या पेशव्यांस किती मानीत होत्या हे चांगले समजतें. तरी शिंदे, गायकवाड वगैरे आपल्या बरोबरीचे त्यांच्या पदरचे संस्थानिक आपला उत्कर्ष होण्याकरितां जसा प्रयत्न करीत तसा त्याही करीत असत, व ज्यावर ते स्वामित्वाचा सारखा हक्क ठेवू इच्छीत त्यावर त्याही तसाच सांगत. सारांश, बाईसाहेबांच्या कारकीर्दीत पेशव्यांचे दुसरे सरदार जसे आपले स्वातंत्र्य संभाळून होते त्याप्रमाणेच त्याही होत्या, व त्यांच्या मरणापर्यंत तें यत्किचितही कमी झाले नाही. त्यांच्या पश्चात् होळकरांच्या राज्याची अव्यवस्था झाली व उत्तरोत्तर त्यांच्या स्वतंत्रतेचा जो ऱ्हास होत गेला त्याची कारणे काय असतील ती असोत, त्यांचा आह्मी येथे विचार करीत नाही; मात्र इतकेच सांगतों की, त्याला बाईसाहेबांची राज्यपद्धति मुळीच कारण नाही.


भाग बारावा समाप्त.