पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२६]
भाग बारावा.


गला उपयोग करून घेतला. वास्तविक ह्मटलें ह्मणजे त्या वेळी सर्व मराठेमंडळामध्ये महादजीसारखा पराक्रमी व राज्यकारस्थानी पुरुष कोणी देखील नव्हता पण त्याच्या अंगी महत्वाकांक्षेचा अनिवार दुर्गुण जडलेला असल्यामुळे त्याच्या पराक्रमापासून मराठ्यांच्या राज्यास नफ्यापेक्षां नुकसानच अधिक भोगणे भाग पडले.

 तरी बाईसाहेबांच्या संबंधाने त्याचे वर्तन चांगले होते. आता हे खरे आहे की, त्याने त्यांच्यापासून एकदा तीस लक्ष रुपये उसनवार ह्मणून घेतले होते व त्या रकमेची फेड त्याने केली किंवा नाही याविषयी जरी कोठे उल्लेख मिळत नाही तरी त्या कर्जाच्या फेडीपेक्षां तो त्यांस अधिक उपयोगी पडला यांत संशय नाही. कारण होळकर आणि शिंदे यांचा मुलूख एकमेकांत फार मिसळलेला असल्यामुळे उभय राज्यांत नेहमी कुरापती उत्पन्न होऊन प्रसंगी लढाई जुंपण्याचाही योग येत असे; पण त्या दोघांत परस्पर स्नेहसंबंध चांगला असल्यामुळे तो टळत असे. अहल्याबाईसारख्या उत्तम स्त्रीस साह्य केलें असतां त्यापासून आपला नावलौकिक मोठा होईल व तोच तिच्यापासून द्रव्य घेण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे असे त्या दूरदृष्टापुरुषास वाटत असे आणि म्हणूनच त्याने आपल्या अमीन लोकांस व इतर मुलकी आणि लष्करी कामगारांस सक्त असा हुकूम देऊन ठेविला होता की, अहल्याबाईसाहेबांचे कोणतेही काम आले असतां ते करण्यास तुह्मी विलंब करीत जाऊं नये.

 महादजी शिंद्याप्रमाणेच दुसऱ्या सर्व स्वतंत्र संस्थानिकांचा