पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परराज्यांशी वर्तणूक.

[१२५ ]


असे. तथापि झालेल्या तहनाम्यांचे कोणी उल्लंघन करून आपल्या राज्याविषयी भलता विचार मनांत आणिल्यास त्यास आपले सामर्थ्य माहीत असावें, व त्यापासून आपल्या प्रजेस आणि स्वतंत्रतेस धक्का पोचू नये ह्मणून आपल्या पूर्ण विश्वासाच्या अशा जंगी दोन फौजा एक उत्तरहिंदुस्थांनांत व एक दक्षिणेत त्यांनी ठेविलेल्या होत्या. पण सुदैवेंकरून त्यांचा उपयोग करण्याचा त्यांस कधी प्रसंग आला नाही. कारण, भूतदया, औदार्य, व नीतीने प्रजापालन इत्यादि लोकोत्तर सद्गुणांविषयी बाईसाहेबांची कीर्ति सर्वत्र पसरलेली असल्यामुळे त्यांच्या अधिकाराचा अपहार करण्यांत यश मिळेल असें कोणासही वाटत नव्हते. एक वेळ मात्र उदेपूरच्या अळशी राण्याच्या जातभाईंनी होळकरांच्या ताब्यांतील रामपुरा परगणा बळकाविण्याचा प्रयत्न केला होता व त्यांस त्या राण्याने मदतीकरितां फौज दिल्यावरून त्यांनी त्यास वेढा दिला. बाईसाहेबांस हे वर्तमान कळतांच त्यांची खोड मोडण्याकरितां त्यांनी आपल्या पाहाऱ्यावरच्या शरीफभाई नांवाच्या मुख्य अधिकाऱ्यास लागलीच बरोबर फौज देऊन रवाना केलें. मग मंदोसरापासून बारा कोसावर दोन्ही सैन्यांची चकमक झडून शरीफभाईने राण्याच्या सैन्याचा पराजय केला, तेव्हां त्या राण्याने अहल्याबाईसाहेबांपाशी क्षमा मागून तहाचे बोलणे लाविले व ते त्यांनी मान्य केलें.

 सर्व स्वतंत्र संस्थानिकांमध्ये बाईसाहेबांचे महादजी शिंद्याशी मोठे सख्य असे, व आपल्या राज्याची अंतर्व्यवस्था उत्तम रीतीने ठेवण्यांत त्यांनी त्याच्या सामर्थ्यांचा व शहाणपणाचा चां-