पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२४ ]
भाग बारावा.


ण्याबद्दल त्या फार खबरदारी घेत, व त्यांच्या अधिकारांचा अपहार करण्याचे कोणी मनांत आणिल्यास त्यास त्या शासन करीत. त्यांनी आपली राज्यव्यवस्था सुधारून आपल्या रयतेस सुख द्यावें ह्मणून सल्लामसलत देण्याकरितां प्रत्येकांच्या दरबारी त्यांनी आपला एकेक हुशार वकील ठेविलेला होता. शिवाय त्या सर्वांनी संतुष्ट राहावे व आपल्या राज्यास कधी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊं नये ह्मणून आपल्या कारकीर्दीत त्यांनी त्यांस कांही विशेष प्रकारचे हक्क दिले होते. बाईसाहेबांच्या अशा उदार स्वभावामुळे व तशाच त्यांच्या विलक्षण प्रकारच्या जरबेमुळे त्यांचे सर्व मांडलिक त्यांच्याशी इतक्या नम्रतेने वागत असत की, त्यांच्या सर्व कारकीर्दीत त्यांपैकी एकाने देखील आपल्या अधिकाराची मर्यादा उलंघून आपणास त्यांच्या कोपास पात्र करून घेतले नाही. इतकेच नव्हे, तर ते सर्व असें ह्मणत असत की, आमच्यावर आपला अधिकार चालवून आमांस सल्लामसलत देण्यासाठी ह्या बाईसाहेब पुष्कळ वर्षेपर्यंत होळकरांच्या राज्यावर राहोत.

 या वेळी सर्व हिंदुस्थानांत पुणे, म्हैसूर, हैदराबाद, नागपूर, बडोदें, ग्वाल्हेर, भरतपूर, दिल्ली, लखनौ, व कलकत्ता इतकी स्वतंत्र राज्ये होती. या सर्वांशी बाईसाहेबांचा पत्रव्यवहार होत असून तो ब्राह्मणांच्या द्वारे होत असे. आपल्या सासऱ्याच्या वेळी त्यांच्याशी जे मित्रत्वाचे तहनामे झालेले होते तेच त्यांनी पुढेही पाळले, व ते कायम राखण्याकरितां प्रत्येक ठिकाणच्या राजदरबारी नेहमी त्यांचा वकील राहात