पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १२ वा.


परराज्यांशी वर्तणूक.


 मागील भागांत अहल्याबाईसाहेबांनी आपल्या राज्याची अंतर्व्यवस्था कशी राखिली होती याचे वर्णन केले. आतां या भागांत त्यांचे परकीयराजांशी वर्तन कसे होते ते पाहूं.

 परकीय राजे या सदराखाली त्यांच्याशी मांडलिक या नात्याने राहणारे राजे आणि स्वतंत्र असून त्यांच्याशी व्यवहार ठेवणारे राजे या दोहोंचाही आह्मी समावेश करितो. त्या वेळेस होळकरांस खंडणी देऊन त्यांच्या अधिकाराखाली राहणारी रजपूत लोकांची व नर्मदेच्या काठची गोंड लोकांची पुष्कळ संस्थाने असत. त्या सर्वांशी बाईसाहेबांचे वर्तन मोठ्या नेकीचे असे. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी त्यापांशी ठरलेल्या खंडणी पेक्षा अधिक खंडणी कधी मागितली नाहीं; यामुळे त्यांच्या कडून ती येण्यास प्रायः विलंब लागत नसे. आणि तसा कधी लागल्यास त्या त्यांस कडक पत्र लिहून त्यांत त्यांचा अन्याय असा स्पष्ट करून दाखवीत की त्यापासून ते शुद्धीवर येऊन ठरलेली खंडणी ताबडतोब पाठवून देत, व विलंब लाविल्या बद्दल त्यांपाशी क्षमा मागत. बाईसाहेबांची मनापासूनची इच्छा आपल्याप्रमाणेच त्यांच्याही राज्यांची भरभराट व्हावी अशी असल्यामुळे त्यांना विशेष त्रास न पोंच-