पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२०]
भाग अकरावा.


अलंकार वगैरे घालण्याची गोष्ट कशास पाहिजे ? त्या नित्य दुपारचे दोन वाजले ह्मणजे दरबारांत जात व तेथे सायंकाळचे सहा वाजत तोपर्यंत सरकारी कामकाज पाहात. पुनः रात्री नऊ वाजल्यापासून अक्रा वाजत तोपर्यंत जाग्या राहून भानगडींच्या कामांचा विचार व राज्यसंबंधाचा पत्रव्यवहार वगैरे करीत. राज्यकारभार हाती घेतल्यापासून दुपारी तासभर वामकुक्षि व रात्री अक्रांपासून पहाटेस चार वाजत तोपयंत निद्रा हीच काय ती त्यांस विश्रांति. कधी कधी तर निकडीच्या सरकारी कामामुळे व उपोषणाच्या दिवशी धर्मशास्त्रांत सांगितलेल्या जागरणामुळे तीही अंतरत असे. पण त्यामुळे नित्याच्या राज्यकारभारांत त्यांच्याकडून कधी हयगय होत नसे.

 इतका वेळ आह्मी आपल्या चरित्रनायिकेच्या सुव्यवस्थित व न्यायी अशा राज्यपद्धतींतील प्रधान अंगांचे विवेचन केलें; तरी याहून तिच्यांत दुसऱ्या पुष्कळ बारीकसारीक चांगल्या गोष्टी आहेत त्यांचे किती जरी वर्णन केले तरी त्या संपणार नाहीत. मात्र इतकेंच सांगतों की, आजपर्यंत जे जे कोणी सदाचारी, न्यायी व प्रजापालनदक्ष असे भूपति या भूतलावर परमेश्वराच्या कृपेनें अवतीर्ण झाले असतील त्यांच्या मालिकेत ती स्त्री असतांही जाऊन बसण्यास सर्वाशी योग्य होती. जे हे तिच्या राज्यपद्धतीचे आह्मी वर्णन करीत आहों तें फाजील व अतिशयोक्तीचे आहे अशी जर कोणास शंका येत असेल तर त्यांस आमचे इतकेंच सांगणे आहे की ही सर्व हकीकत या भागाच्या आरंभी ज्यांचे नांव निर्दिष्ट केले आहे त्या मालकम