पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[११९ ]


सारांश,परमेश्वराच्या घरी सर्व धर्म सारखे आहेत, त्यांत अमुक चांगला, व अमुक वाईट असें मुळीच नाही असे त्यांचे मत असल्यामुळे स्वधर्मातील लोकांस त्यांच्याकडून जे सुख प्राप्त झाले तेंच परधर्मातील लोकांसही मिळाले होते व त्यामुळे त्या स्वकीय लोकांस जितक्या पूज्य आणि आवडत्या झाल्या होत्या तितक्याच परकीय लोकांसही झाल्या होत्या. सर्व लोकांस सारख्या रीतीने वागविण्यांत जी राज्यपद्धति अकबरबादशाहाने व त्याच्या मागून शिवाजीमहाराजांनी घालून दिली होती तिचेच त्यांनी अनुकरण केले होते.

 कोणीही मनुष्य एकदा एका कामांतून निघून दुसऱ्या कामांत, पडला ह्मणजे पूर्वीच्या कामासंबंधाचा त्याचा सर्व व्यासंग सुटतो असा सर्वत्र नियम आहे; पण अहल्याबाईसाहेबांविषयी आश्चर्य वाटण्यासारखी ही मोठी विलक्षण गोष्ट आहे की, त्या सांप्रत राज्यकारभारांत पडल्या होत्या व आपल्या प्रजेस आपली राज्यव्यवस्था सुखावह होण्याविषयीं अविश्रांत मनाने आणि शरीराने श्रम करीत होत्या तरी त्यांच्या पूर्वीच्या वर्तनक्रमांत कधी किंचितही अंतर पडले नाही. प्रातःकाली उठून स्नान व देवपूजा करणे, पुराण ऐकणे, ब्राह्मणांस दाने देणे, व धर्मात सांगितलेली व्रतें व उपास वगैरे करणे या संबंधाने त्यांचा चाललेला क्रम जो पूर्वी वर्णिलेला आहे त्याप्रमाणेच या वेळीही अबाधित चालू असे. पति वारल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करण्याचा जो त्यांनी नियम केला होता तोही त्यांजकडून सुटला नाही. हे त्यांचे पांढरे वस्त्र इतकें साधे असे की, त्यास एकादी जरीची किनारी देखील नसे. मग अंगावर एकादा