पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[११७ ]


कमाविसदारास सावकाराच्या दौलतीचा अभिलाष उत्पन्न होऊन त्याने त्या बाईपाशी तीन लक्ष रुपये नजराणा ह्मणून मागितले व ते दिल्याशिवाय मी दत्तक घेऊ देणार नाही असें सांगितले. याशिवाय आणखी त्याने तिला अशीही धमकी दिली की इतका नजराणा जर मला मिळाला नाही तर तुझ्या नवऱ्याची सर्व मालमत्ता बेवारसी ह्मणून मी सरकारांत जप्त करीन. बिचाऱ्या खेमदासाच्या बायकोस हा कमाविसदाराचा दपटशहा केवळ जुलूम वाटून ती आपल्या भावी दत्तक मुलास व दुसऱ्या पुष्कळ सोयऱ्याधायऱ्यांस बरोबर घेऊन महेश्वरी बाईसाहेबांकडे गेली व त्यांच्या पायांवर डोके ठेवून व त्यांस सर्व हकीकत सांगून मला न्याय द्या असें ह्मणाली. बाईसाहेबांनी एक दिवस देखील तिला 'काय होईल कसे होईल' अशा दुग्ध्यांत न ठेवितां व तिजपासून काहीएक नजराणा न घेतां तिचा तो दत्तक कबूल करून त्यास आपल्या मांडीवर घेतले व वस्त्रे, दागिने त्यास देऊन त्याच्या तोंडांत साखर घातली. नंतर पालखीत बसवून मोठ्या थाटाने त्याची त्यांनी सिरोजेस रवानगी केली व त्या लोभी कमाविसदारास त्याच्या अन्यायाचरणाबद्दल कामावरून दूर केलें.

 दुसरी एक अशी गोष्ट आहे की, खरगोण येथें तापीदास व बनारसदास ह्मणून दोघे बंधु मोठे श्रीमान सावकार होते व ते दोघेही पोटीं संतान नसतानांच एका मागून एक असे एका वर्षाच्या आंत परलोकवासी झाले. मरते वेळी त्या दोघांजवळ दोन लक्ष रुपये रोख होते व दोन लक्ष त्यांच्या कुळांकडे येणे होते. तेव्हां तापीदासाच्या बायकोनें अहल्याबाईसाहेबांस असे कळविलें