पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[११५ ]


असत व त्यांची इतराजी कधी न होईल असे आपले वर्तन ठेवीत असत.

 बाईसाहेब राज्य करूं लागल्यापासून प्रत्येक बाबतीत त्यांनी आपल्या अंगी असलेल्या दोन्ही गुणांचा प्रसंग दिसेल त्याप्रमाणे उपयोग केला. एक गुण दया आणि दुसरा धाक. प्रजेस सन्मार्गाकडे वळविण्याकरितां दया आणि दंड ही दोन्हीं साधनें राज्यकर्त्याच्या अंगी असणे अवश्य आहे. ती अहल्याबाईसाहेबांच्या अंगी पूर्णत्वानें वास करीत होती व त्यांचा प्रसंग पाहून त्या उपयोग करीत असत. बारिकसारिक अन्याय कोणाकडून घडला असतां त्या त्याच्यावर दया करीत व पुनः तसे न करण्याविषयीं ताकीद देत. या त्यांच्या स्वभावामुळे कधी कधी मोठे अपराधी देखील क्षमेच्या आशेने आपला अपराध आपण होऊन कबूल करीत. पण चोऱ्या वगैरे अपराधाबद्दल त्या कधी क्षमा करीत नसत. धाक दाखविण्याच्यासंबंधाने इतकी विलक्षण हातोटी त्यांस साधून गेली होती की, अत्यंत कठोर अंतःकरणाचा व निगर्गट्ट असा जरी कोणी अपराधी असला तरी त्याच्या मनांत त्या दहशत उत्पन्न करून त्याकडून अपराध कबूल करवीत व त्यास योग्य शासन देत. या त्यांच्या धाकाचा दुसरा असाही उपयोग होत असे की, त्यांच्या पदरच्या हक्कदाराकडून कधी खंड वगैरे येण्यास उशीर लागल्यास त्यांनी त्यांस जरा रागाचे पत्र पाठवावें ह्मणजे लागलाच तो त्यांकडून रवाना होत असे.

 अहल्याबाईसाहेबांनी राज्यकारभार आपल्या अंगावर घे-