पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विषयप्रवेश.

[५]


घेऊं लागला, व लवकरच आपल्या बरोबरीच्या सर्व बारगिरांवर त्याने ताण करून सोडली.

 कोणाही मनुष्याच्या अंगांत जरी मोठे अलौकिक गुण असले तरी ते उदयास येण्यास कालाची अनुकूलता व गुणग्राहक पुरुष यांचा योग आला पाहिजे. मल्हारी हा बारगीर बनला त्या वेळी महाराष्ट्र देशाचे प्रभु सातारकर श्रीमंत शाहु छत्रपति आणि दिल्लीचा बादशहा या दोघांत लढाईची सुरुवात झाली अमून शूर पुरुषांस आपल्या अंगांतील शौर्य दाखविण्यास चांगली संधि आली होती; व छत्रपतीचे सेनानी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ व त्यांचे पराक्रमी पुत्र बाजीरावसाहेब पेशवे हे खऱ्या गुणांचे मोठे मार्मिक परीक्षक होते, त्यामुळे छत्रपतीची फौज बादशहाच्या फौजेशी सामना करण्याकरितां खानदेशांतून जात असतां तींत शिरून आपले दैव काढण्याचा योग मल्हारीस आला. तो शिलेदार होऊन आपल्या मामाच्या अनुमताने श्रीमंतांच्या लष्कराबरोबर दिल्लीपतीशी लढण्याकरितां गेला. नंतर बादशहाच्या फौजेशी मराठ्यांच्या फौजेच्या ज्या काही लढाया झाल्या त्यांत त्याने आपले पुष्कळ शौर्य व चातुर्य दाखविलें आणि श्रीमंतांस विजय मिळवून दिला. त्याच्या अंगचे अलौकिक गुण श्रीमंतांच्या लक्षात येतांच त्यांनी त्यास एकदम पांचशे स्वारांची मनसबदारी देऊन आपल्या पदरी निरंतर ठेऊन घेतले.

 यानंतर काही वर्षांनी श्रीमंतांनी माळव्यावर स्वारी केली त्या वेळी तो प्रांत दायबहादूर ह्मणून एका शूर हिंदुसर-