पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११०]
भाग अकरावा.


पुण्यशील स्त्रीला भरपूर होतेच. वर सांगितलेले साहेब मजकूर परकीय असतां त्यांनी होळकरांच्या घराण्यास भूषणास्पद झालेल्या या अद्वितीय स्त्रीचा तिच्या राज्यपद्धतीबद्दल केलेला गौरव तिनेच काय, पण आपण सर्व महाराष्ट्रीयांनीही अभिमान धरण्याजोगा आहे असे आह्मांस वाटते. आतां तिची न्यायी राज्यपद्धति कशा प्रकारची होती व ती होळकरांच्या प्रजेस कशी सुखावह झाली हे पाहिले पाहिजे.

 श्रीमंत अहल्याबाईसाहेब ( या भागापासून आम्ही आमच्या चरित्रनायिकेचा या बहुमानार्थी नांवाने उल्लेख केला आहे.) यांनी होळकरांच्या राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतल्यावर गोविंदपंत गान ह्मणून कोणी ब्राह्मण मोठा हुषार व प्रामाणिक असल्याबद्दल त्याचा नावलौकिक त्यांस कळल्यावरून त्यांनी त्यास आपल्या दरबारी बोलाविले व त्याची योग्य परीक्षा करून त्यास आपल्या मुख्य कारभाऱ्याच्या जागी नेमिलें. प्रथमतः त्यांनी त्याच्याकडून आपल्या सासऱ्याच्या वेळेस जे कायदे सुरू होते ते आपल्या प्रजेस अधिक सुखावह होतील अशा रीतीने सुधारून ते सर्व राज्यांत चालू केले. त्यांच्या चांगल्या राज्यव्यवस्थेचा मूळ पाया म्हटला ह्मणजे शेतकऱ्यांपासून त्यांच्या उत्पन्नाप्रमाणे नेमस्त सारा घेणे व गांवांतील पाटीलकुळवर्णी यांचे वंशपरंपरेने चालत असलेले हक्क त्यांकडेस कायम राखणे; तसेच प्रत्येक महालाच्या ठिकाणी योग्य कामगार नेमून त्याकडून त्यांतील रयतेचे संरक्षण करून तिजपासून ठरलेला वसूल गोळा करणे हा होता. ज्या राज्यांत एकदा कोणत्याही कामावर नेमिलेले कामगार