पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमाबाई-तीर्थयात्रा.

[१०७]


प्रलयं गता अशी एक ह्मण आहे; तदनुसार वागणाऱ्या ज्या राघोबाने होळकरांच्या राज्यावर गदा आणली होती पण त्याला यश न मिळतां तो फजित होऊन मावारा गेला होता त्याने श्रीमंत माधवरावांच्या मागून पेशवाईच्या गादीवर विराजमान झालेला आपला पुतण्या जो नारायणराव त्याला गर्दयोकडून ठार मारवून आपण पेशवाईचा उपभोग घेऊ लागला. "राबोबाचे हे भयंकर कृत्य ऐकतांच अहल्याबाईस अत्यंत दुःख झाले व त्याच्या त्या कृतीचा संताप येऊन तिने त्यांस शाप दिले, व यापुढे पेशवाईची धडगत दिसत नाही असे त्या वेळीच तिनें भविष्य केले. असो.

 यानंतर थोड्याच दिवसांत तुकोजीकडून अहल्याबाईस अशा आशयाचे पत्र आले की, पेशव्यांच्या सर्व कारभारी मंडकींनी राघोबास पदच्युत करण्याची मसलत केली असून त्या कामांत आपले साह्य मागितल्यावरून मला पुण्यास जाणे अवश्य आहे; यासाठी मातुश्रींनी तीर्थयात्रा संपवून लवकर येथे यावे, व मी पुण्यास असें तोपर्यंत राज्यकारभार पाहावा. तुकोजीचें असें पत्र येतांच तिला आपली तीर्थयात्रा आटपून इंदुरास जाणे भाग पडले.

 इंदुरास आल्यावर अहल्याबाईची व तुकोजीची भेट होऊन त्याने सर्व राज्याची सूत्रं तिच्या हाती दिली व आपण पुण्यास निघून गेला. यापुढे तिकडे एकामागून एक अशी इतक्या भानगडीची राज्यकारस्थानें उत्पन्न झाली की त्यासर्वात त्याला प्रमुखत्व घेणे भाग पडून अहल्याबाईचा अंतकाल होईपर्यंत