पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०६]
भाग दहावा.


तीर्थयात्रेप्रमाणेच पुराणश्रवण व साधुपुरुषदर्शन ही धर्मशास्त्रांत परलोकप्राप्तीची मोठी साधनं सांगितली आहेत, ह्मणून पुण्याहून तीर्थयात्रेचा संकल्प करून निवते वेळी अहल्याबाईनें आपल्या बरोबर एका विद्वान् व कर्मठ पुराणिकास घेतले होते, आणि त्याकडून तीर्थयात्रेच्या कालांत भारत, भागवत, रामायण इत्यादि सर्व ग्रंथ तिनं भक्तिपूर्वक श्रवण केले. तसेंच परमेश्वर प्राप्तीसाठी निरिच्छपणे सर्व ऐहिक व्यापार सोडून गिरिकंदरी, व घोर अरण्यामध्ये बसलेल्या ज्या पुरुषांचे तिला वर्तमान कळले त्यांचेही दर्शन घेऊन तिने आपणांस धन्य मानिलें.

 या ठिकाणी आणखी हेही सांगितले पाहिजे की, आमच्या चरित्रनायिकेस तीर्थयात्रेच्यासंबंधाने ज्या ज्या ठिकाणी जाण्याचा योग आला ती ठिकाणे ज्या संस्थानिकांच्या अधिकाराखाली होती त्या सर्वांच्या कानावर अहल्याबाईच्या अंगी असलेल्या सद्गुणांची कीर्त गेलेली होती; ह्मणून अशी साध्वी आपल्या राज्यांत आली हा आपला केवळ भाग्योदयच होय, असे त्यांस वाटून त्यांनी आपणाकडून होईल तितकी तिची बरदास्त ठेविली व तिला पाहण्याची आपली इच्छा प्रत्यक्ष तिला भेटून पूर्ण केली. आपणाविषयी त्यांनी दाखविलेल्या कळकळीबद्दल अहल्याबाईनेही त्यांची योग्य स्तुति करून आभार मानिले.>br>

 याप्रमाणे साध्वी अहल्याबाईचा तीर्थयात्राक्रम असा सुखावह रीतीने चालला असतां पुण्याकडे आणखी एक भयंकर वर्तमान घडल्याचे तिच्या कानावर आले. स्त्री बुद्धि;