पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०२]
भाग दहावा.


सांगितल्यावांचून वाचकांस कळेलच. आपल्या दुर्गुणामुळे होत असलेल्या जननिंदेचे दुःख ही आपल्या सौंदर्याच्या अभिमानाने नाहीसे करण्याचा प्रयत्न करीत असे. अहल्याबाई जोपर्यंत पुण्यास होती तोपर्यंत तिला ती कधीही भेटावयास आली नाही. अथवा त्या साध्वीच्या दर्शनानें कदाचित् आपली दुष्टबुद्धि फिरून, पुढे पेशवाईचा समूळ उच्छेद करण्याचा आपला बेत ढासळेल की काय या भीतीनेच जणूं काय तिची भेट घेण्याची तिला बुद्धि झाली नाही असे म्हटले तरी चालेल. तरी रोज कानांवर येणारी अहल्याबाईची प्रशंसा तिला दुःसह होऊन एके दिवशी ती कशी दिसते ते पाहून येण्याकरितां तिने आपली दासी पाठविली. तेव्हा तिला पाहून येऊन दासीने सांगितले की, अहल्याबाई रूपाने काही सुंदर नाही; तरी तिच्या मुखावर स्वर्गीचे दिव्य तेज चकमत आहे. दासीचे हे शब्द ऐकतांच ती दुष्ट आनंदीबाई ' ती कशीही असो, पण मजसारखी सुंदर तर नाही ना ' असें ह्मणून समाधान पावलीं ! धन्य तिची !

 यानंतर लवकरच आह्मां महाराष्ट्रियांच्या दुर्दैवाने थेऊर मुक्कामी श्रीमंत माधवरावपेशवे यांचा काल झाला, मरणाच्या अगोदर काही दिवस ते तेथे जाऊन राहिले होते. व त्यांच्या बरोबर त्यांची स्त्री रमाबाई इनें सर्व ऐहिक ऐश्वर्य तुच्छ मानून सहगमन कले ! ही हकीकत अत्यंत हृदयद्रावक आहे परंतु या ठिकाणी तिचे वर्णन अप्रासंगिक होईल, ह्मणून ते आह्मी करीत नाही; यामुळे वाचकांचा कदाचित् हिरमोड होईल, पण त्यास आमचा इलाज नाही. तथापि वाचकांना तो दुःखकारक आणि भयंकर प्रसंग कसा असतो हे समज-