पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- इंदूर संस्थानच्या महाराणी श्रीमंत अहल्याबाईसाहेब होळकर MEIN याच चारत्र.Tera कम भाग पहिला EOISTRIBE लागणाविषयप्रवेश. जोरात ETTERESTIOकामा भ जगदीशाच्या कृपेनें या आपल्या देशांत जे शूर, साहसी, विद्वान्, नीतिमान, राजकारस्थानी व सदाचारी असे अनेक पुरुष अवतीर्ण झाले, त्यांच्या गुणांचे यथावद्वर्णन जसे आपण करितो तसें परकीय लोक करीत नाहीत; इतकंच नाही, तर त्या पुण्यपुरुषांच्या सद्गुणांविषयी जणुं काय त्यांच्या मनांत मत्सर उत्पन्न होऊन त्यांच्या उज्ज्वल कीतीस कलंक लावण्याकरीता ते गुणांऐवजी दोषांचे हेतुपूर्वक परीक्षण करून ते प्रसिद्ध करितात व त्यांच्या ठायीं ते नच आढळले तर आपणांस वाटतील ते भलतेच दोषारोप.बळेच त्यांच्यावर लादतात. याचे प्रत्यंतर बघण्यास फारसे लांब जाणे नको. या भरतखंडांत सर्वत्र अविंधशाई होऊन हिंदुलोकांत हाहाकार झाला असतां, ज्यांनी का अनेक संकटें सोमून आपल्या लोकोत्तर धैर्याने व साहसाने