Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )

 अस्पृश्यांच्या एकंदर स्थितीचा विचार करून त्यांच्या तक्रारीला एकच नांव द्यावयाचे म्हटलं तर तें अस्पृश्यता हें होय. सुशिक्षित महारांनी आपल्या स्थितीचे ठळक निदर्शन स्वतःला 'बहिष्कृत' हेंच विशेषण लावून केले आहे. तेव्हां त्याच्या दृष्टीनेंहि बहिष्कार अगर अस्पृश्यता हेंच त्याच्या तक्रारीचे मुख्य नांव आहे. जन्मानेच कमी समजलें जाणे इत्यादि दुसऱ्या कांहीं बाबींत, इतर ब्राह्मणेतरांबरोबरच ब्राह्मणांविरुद्ध भांडावयास त्यांना एक विस्तृत अधिष्ठान सांपडतेच, पण त्याच्या जोडीला अधिक जिकीरीचे व केवळ त्यांनाच लागू असें 'अस्पृश्यता' नांवाचे एक निराळे अधिष्ठान आहे. प्रस्तुत लेखांत या उभयतांविषयींची चर्चा व्हावयाची आहे. पण या स्वतंत्र अधिष्ठानाचेच महत्त्व जास्त आहे हे उघड आहे. अस्पृश्यतेसंबंधीं व्हािवयास लागण्याच्यापूर्वी- म्हणजे तिच्यामुळे आपले राजकारण, समाजकारण इत्यादींवर काय काय विपरीत परिणाम होत आहेत, खुद्द अस्पृश्यांना तिच्यामुळें कसकसे हाल सोसावे लागत आहेत, व शेवटी तिच्या निवारणासाठी उपाययोजना कसकशी करावी इत्यादि गोष्टींचा ऊहापोह करावयाच्या पूर्वी-अस्पृश्यतेच्या अस्तित्वाविषयी दोन शब्द लिहिणे जरूर आहे. कोणी असें म्हणेल कीं, अस्पृश्यतेच्या अस्तित्वासंबंधी शंका आहे कोणाला? जी गोष्ट धडधडीत दिसत आहे ती सिद्ध करण्याची खटपट कशाला? तर अशा वाचकांना इतकेंच कळवावयाचे आहे की, स्वतःवरून जग आपण ओळखण्याचे सौजन्य दाखवीत आहां. खेडेगांवांत आणि जुन्या मगरमिठ्या अगदीं गच्च राहिलेल्या शहरच्या भागांत जरा हिंडून पाहावें. विषयाचा प्रस्ताव करून देऊन जुन्याचे अभिमानी वावदूक कसे तडकाफडकी निकाल देत आहेत हें बाजूला उभे राहून ऐकावें म्हणजे वरील खटपट करणे जरूर आहेसे वाटू लागेल. वादविवाद