पान:अस्पृश्य -विचार.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७ )

केला असतांना व कोटिक्रमाचे कैचीत आपण होऊन उतरलों असतांना एकादी अप्रिय गोष्ट कबूल करण्याची आपत्ति उत्पन्न होण्यासारखी आहे असे दिसत असले तर वादाला तोंडच लागूं नये म्हणून तेचं आंतत्वच मुळीं नाकबूल करण हा मोठा हटकून लागू पडणारा डाव असतो; आणि चमत्कार हा की, अगदीं अडाणी माणसाला सुद्धां हा डाव करण्याचे स्थळ कोणतें हें तर्काचे विळखे माहीत नसतांना सुद्धां कळतें म्हणून अशाच्या सोयीसाठीं ही खटपट पाहिजे, नाही तर ‘‘ फिर्यादीचा हांडा आम्ही आणलाच नाहीं ’’ हा वकीलसाहेबांचा कोटिक्रम निरुत्तर समजला जावयाचा ! सामाजिक बहिष्कार या लोकांना नाही म्हणावें तर ते आमच्या आजूबाजूद कोठे दिसत नाहीत हें कसें ? सभागृहांत इतर अप्रबुद्ध श्रोत्यांबरोबर हे कसे ऐकत बसत नाहीत ? नदीच्या पाणवठ्यावंर व विहिरीचावडीवर शेजारधर्मात घेतलेला मुसलमान दिसते, मग हा अस्पृश्य दिसत नाहीं हैं कसे ? मंडईमध्ये संत्रनारिंगें बिकाचयास लांकडी सिंहासनावर अधिष्ठित झालेला अस्पृश्य अगदींच कसा दिसत नाहीं ? शाळेतल्या क्रमिक पुस्तकांत जणू काय जातीजातींचे वायी संमेलन करण्यासाठी ‘ यमुनामैना ’ च्या जोडीला ‘ फति मामरिअम ’ चे धडे विलुगून लिहिलेले दिसतातत्यांत जाधवाचा दलपतहि असतो, मग महाराचा मुद्गा दिसत नाहीं हें कसे ? दक्षिणमहाराष्ट्रांतील एका प्रसिद्ध देवळाच्या सभामंडपाशेजारच्या हौदावर आपला मुसलमानबंधुसुद्धां चुळा भरतांना दिसतो; पण महार दहा हातांवर उभा राहतो हैं कशाचे लक्षण ? घेड मामलेदार कोणीं ऐकला आहे ? महार सावकाराकडे कर्ज काढावयास कोणी गेला आहे ? त्यांची प्रत्यक्ष अद्वैतविचारांनीं मिष्ट झालेली गीतें ईंत विसरून कोणी ऐकली आहेत? आणि इतकी आहे तरी 'अस्पृश्यता आहे कोठे ? असें नकारात्मक उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यांत येतें तें येतेच.