पान:अस्पृश्य -विचार.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५६ )

वळीत गोवून टाकावेत म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न आपोआपच सुटेल. या कोटीवर मागे एके ठिकाणी उत्तर आले आहे.पण नवीन हवेंच असल तर बर्कच्या शब्दांनी अस्पृश्याला असे म्हणता येईल की, आमच्या मनांत जर दशप्रीति उत्पन्न करावयाची असेल तर आमचा देश अगोदर प्रीतियोग्य झाला पाहिजे. स्वदेशप्रेम उत्पन्न होण्यासारखी स्थिति अस्पृश्यांच्या बाबतीत अजून नाही, ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यांच्या दैन्याचे वर्णन केले म्हणजे कोणी म्हणतात की, कित्येक वरिष्ठ लोकांपेक्षा त्यांची सांपत्तिक स्थिति चांगली आहे. असे असेल तर ' इतपत चांगल्या माणसांना सुद्धा दूर ठेवणे सामाजिक दृष्ट्या परवडतें ना !' असे परत विचरता येण्यासारखें आहे. कोणी कोणी त्यांना ' साहेबाच्या बशा चाटणारे ' म्हणून हेटाळतात. हे तर जखमेंत मीठ भरण्यासारखे निर्दयपणाचे आहे. पोट प्रत्येकाला आहे. आणि त्याची खळगी भरण्यासाठी जिवाची काय कुतरओढ होत आहे ती वरील आक्षेपकाच्या वाटणीला आली नाही असे दिसंते. ह लोक सरकारशी मिसळतात ' म्हणून कोणाचा घुस्सा आहे. याला उत्तम तोडगा म्हणजे त्यांना आपल्यांत घेणे येवढाच आहे. ' ते अमुक एक प्रकारच्या पिसाटांची भाषणे चविष्टपणान ऐकतात ' असाहि आरोप आहे. यावर इतकेच म्हणता येईल की, तुमचीहि भाषणे त्यांना ऐकवा, त माणसांतून उठलेले नाहीत, सद्विचार कानी पडल्यास त्यांना तो आवडत नाही असे मानणे चूक आहे, त्यांची आणि तुमची कधीच गांठ पडत नाही. अर्थात् ज्यांची पडते त्यांचे ते ऐकतात. मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तुझ्याशी कोणी बोलला तर मला कसेसे वाटेल असे म्हणून कसे चालेल ? तात्पर्य काय की, अशी उडवाउडव वरून चालावयाचे नाही. ज्याला